*कृतज्ञता कारसेवकांची*
*श्री विघ्नेश्वर मंदिर व ब्राम्हण सभेने केला कारसेवकांचा सत्कार*
===========================
*श्रीराम प्रतिमा व मिठाई देऊन केले सन्मानित*
===========================
राजुरा येथिल प्राचिन श्री विघ्नेश्वर मंदिर देवस्थान व ब्राम्हण सभेच्या वतीने 1990 व 1992 मधे अयोध्या येथे रामजन्मभूमी मुक्ती साठी झालेल्या कार सेवेत आपल्या प्राणाची बाजी लावून प्रभु श्रीरामाची सेवा करणाऱ्या राजुरा येथिल कार सेवकांचा त्यांच्या घरी जाऊन शाल, श्रीफळ तसेच प्रभु श्रीरामाची प्रतिमा व मिठाई देऊन त्यांचा सहपरिवार सत्कार केला व कृतघ्नता व्यक्त केली.
1990 व 1992 मधे झालेल्या कार सेवेसाठी राजुरा येथुन विश्वास देशकर, तुषार देवपुजारी, राजेन्द्र येनुगवार, अविनाश चिंचाळकर, मिलिंद देशकर, सुरेश वाटेवर, दौलत वाटेकर, प्रविण मगंरुळकर, मुक्तेश्वार मुजुमदार, प्रसन्न देशपांडे, किरण गाडगे, सुरेंद्र डोहे, अरुण मस्के, जिवन बुटले, बाबा खंडाळे इत्यादी रामभक्तांनी अक्षरशः ‘परत आलो तर तुमचा अन्यथा रामाचा’ अशा शब्दात कुटुंबीयांचा निरोप घेऊन प्रभु श्रीराम चरणी नतमस्तक होण्यासाठी राजुरा येथुन अयोध्येसाठी रवाना झाले.
आजच्या मुर्त रुपात आलेल्या श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या पायभरणीतील मैलाचा दगड ठरलेल्या ह्या कार सेवेत सहभागी होऊन मुलायम सरकारने राम भक्तांवर केलेल्या बेछूट गोळीबाराचे साक्षीदार ठरलेल्या व राम मंदिराच्या पायथ्याच्या जणु दगड रचणाऱ्या ह्या कार सेवकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री विघ्नेश्वर मंदिर देवस्थान व राजुरा तालुका ब्राम्हण सभेचे अध्यक्ष वैभव वैद्य, सचिव ॲड. शंतनु देशमुख, कोषाध्यक्ष राहुल अवधुत, उपाध्यक्षा सीमा देशकर, सहसचिव पुजा घरोटे ह्यांचेसह मयुर गाडगे, विलास अंदनकर, स्वतंत्रकुमार शुक्ला, कपिल रैच, अमोल देशमुख, वाणी वैद्य, अनुष्का रैच, नम्रता खोंड, राधा धनपावडे, नम्रता खंगन हयांचेसह इतर सदस्यांनी कार सेवकांच्या घरी जाऊन त्यांचे विधिवत औक्षण करून सहकुटुंब सन्मान केला. विशेष म्हणजे तत्कालीन कार सेवक सुरेंद्र डोहे ह्यांचा मृत्यु झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा तसेच राजुरा शहरातून इतरत्र स्थाईक झालेल्या कार सेवकांचा देखिल त्यांच्या गावी जाऊन सन्मान करण्यात आला.