जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुरा येथील इस.१९९६ -९७ इत्या १० वा ब एक अविस्मणीय स्नेहमिलन सोहळा संपन्न*

0
343

✍🏻 *आशिष आर. यमनुरवार जिल्हा प्रतिनिधी खरे वृत्तांत*

 

*जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुरा येथील इस.१९९६ -९७ इत्या १० वा ब एक अविस्मणीय स्नेहमिलन सोहळा संपन्न*

 

दिनांक २१ जानेवारी २०२४ ला राजुरा येथील जिल्हा परिषदेचा परिसरात इस.१९९६ -९७ इत्या १० वा ब *अविस्मरणीय स्नेहमिलन सोहळा* संपन्न झाला. २८ वर्षा नंतर सर्व वर्ग मित्र मैत्रिणी एकत्र आले.

शाळेचा परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे चे संचालन मधुर अशा वानी मध्ये सौ. रीता खोके (देरकर) यांनी केले…

आम्हा सर्वांना ज्या गुरुजनानी घडविल त्या सर्व गुरुमाऊलिंचे स्वागत करून पुष्पगुच्छ शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आले..

१९९६ चा वर्ग शिक्षिका सेवा निवृत्त श्रीमती ठाकूरवार मॅडम सौ. गावतुरे मॅडम, सौ. बारापात्रे मॅडम ,श्री. इत्तडवार सर, श्री. मुसळे सर, श्री. वैरागडे सर, श्री. दुर्गे सर, श्री. टिपले सर, श्री. झाडे सर, श्री. कोठारे सर, श्री. उईके सर, सौ. माया बाई, श्रीमती येल्लेवार बाई व सौ. डाहुले बाई व श्री एकरे बाबुसाहेब उपस्थित होते. कार्यक्रमाची रूपरेषा व प्रस्तावना श्री. नागेश दाचेवार यांनी केली. काही जुन्या गोष्टीचा त्यावेळी उजाळा झाला आणि तिथे बसून असे वाटतं होते की कॅलेंडर २८ वर्ष मागे गेलं की काय. बरेच जण दुरून वेळात वेळ काढून तिथे जुन्या मित्र मैत्रिणींना गुरुजनाना शाळेला भेटायला आले.. श्री. डॉ. राहुल राणे मुंबई, श्री. मंगेश पुणेकर व श्री गणेश मोगल पुणे वरून आले होते..

आमचा मधून आमचे वर्ग मित्र कमी वयातच आमच्यातून निघून गेलेत तसेच काही आमचे गुरुजन पण आम्हाला सोडून गेलेत त्यांची स्मृती म्हणून सर्वांनी दोन मिनिट मौन पाळले.

*”गुरूचे स्थान देवापेक्षा मोठे आहे.”*

*”सर्वात श्रेष्ठ आणि श्रेष्ठ आदर म्हणजे गुरूंचा,”*

*”गुरू हा ज्ञानप्राप्तीचा आधार आहे.”*

*”गुरू म्हणजे शिष्याच्या ज्ञानाच्या सुकाची किनार”..!*

जसे लहान बाळाला जपते त्याला प्रत्येक गोष्टी संस्कार देते चांगल वाईट याच ज्ञान देते अशी आमचा सर्वांची गुरुमाऊली आमची आई श्रीमती ठाकूरवार मॅडम यांनी सुंदर अशा त्यांचा मधुर वाणी तून मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की या आधी सुद्धा या परिसरात जुन्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम घेतला पण असा कार्यक्रम आज पर्यंत झाला नाही आणि होणार ही नाही. सौ. गावतूरे मॅडम यांनी सर्वांना व्यसने पासून दूर राहायला सांगितले. श्री. गवतुरे सर, श्री. ईतडवार सर,श्री. दुर्गे सर, श्री. वैरागडे सर, श्री. मुसळे सर, श्री. कोठारे सर, श्री. उईके सर, श्री. झाडे सर यांनी जुन्या गोष्टींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले. आमचा मित्र डॉ राहुल राणे यांचे आई वडील कार्यक्रमाला उपस्थित होऊन आम्हा सर्वांचा त्यांनी आनंद द्विगुणित केला..

त्यानंतर डॉ. राहुल राणे, प्रदीप वासाडे, विवेक ईतडवार व श्रीमती ज्योत्स्ना कुकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

*”किती सुंदर होते ते शाळेचे दिवस दोन बोट जोडली की दोस्तीला पुन्हा सुरुवात व्हायची, मोठे होता होता सरलं सारं बालपण मैत्री आपली अशीच राहील आज, उद्या आणि कायम”…!*

श्री. ईडतवार सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की २०२८ मध्ये या जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाला १०० वर्ष पूर्ण होतील तर २०२८ मध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करायचं आहे.

आधी सर्व शिक्षक वृंद असे म्हणायचे की *१० वा ब* वर्ग बदमाश आहे, खर आम्ही सर्वांनी त्या ३ वर्षात जितक्या मोज मस्त्या केल्या तेवढ्या कधी कोणी त्या विद्यालयात केल्या नसाव्यात, पण खर आज सर्वांना व मला अभिमान होतो की माझे वर्ग मित्र मैत्रीणी आपल्या जीवनात चांगल्या पदावर कार्य करत आहे आणि काही गृहिणी आपल्या घरात समाजात झाशीच्या राणी लक्ष्मीबाई सारखं जबाबदारी पार पाडत आहे. सर्वांचे आभार सिद्धेश्वर जंपलवार यांनी मानले.

त्यानंतर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि मग वर्ग भरविण्यात आले आज २८ वर्षा नंतर आमचा वर्ग शिक्षिका ठाकूरवार मॅडमनी हजरे घेतली आणि सर्वांनी निरोप घेतला.. निरोप घेताना बऱ्याच जणांची डोळ्यात पाणी आले..

कार्यक्रमाचा यशस्वी ते साठी बबलू हुसेन, रूपेश काकडे, संतोष पिपरवार, विनायक काळे व सिद्धेश्वर जंपलवार खूप मेहनत घेतली व त्यांचा या मेहनतीला खूप सुंदर असे यश मिळाले यांचा मेहनती मुळेच हा कार्यक्रम यशस्वी आणि अविस्मरणीय झाला..

*”मैत्रीच्या सहवासात*

*अवघं आयुष्य सफ़ल होतं*

*देवाच्या चरणी पडून जसं*

*फ़ुलांचही निर्माल्य होतं..”!*

 

या अविस्मरणीय क्षणाला काल

बबलू हूसेन,राहुल राणे, संतोष पिपरवार,मंगेश पुणेकर,गणेश मोगल,नावेद पठाण,ज्योत्स्ना धोटेकर,प्रमोद साळवे,रुपेश काकडे,रिता देरकर, मारोती गोखरे, विनायक काळे,विवेक ईतडवार,रवींद्र बोबडे,योगेश बोनगीरवार, प्रदीप वासाडे, आशिष कोल्हे, रवी चांदेकर, सुवर्णा बोबडे, सिद्धेश्वर जंपलवार, आरती पंदीलवार (जंपलवार), जमीर पठाण, संजय रेगुठावार,सुवर्णा गोरे, सविता आमाणे, संजय कार्लेकर, देविदास डोहे, राजेश चहारे, श्वेता चिंचालकर, गिरीधर ठाकरे, नागेश दाचेवार,अमित देशपांडे,मेघराज खंडाळे,नीता फुलके, हंसराज निकुरे,जाफर अली, प्रवीण रामटेके, आशिष यमनूरवार, मनीषा पोटे, स्वप्नील धोटे, भोला मोहितकर, नैना करमणकर व शंकून खोके उपस्थित होते….!

*आयुष्याच्या प्रवासात चांगले मित्र मैत्रिणी भेटतात आणि चांगल्या आठवणी देऊन जातात, तुमच्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाची गोड आठवणी कायम माझ्या ह्रदयात राहील..!*_ आशिष आर. यमनुरवार…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here