घरीफोडी करणारा रेकार्डवरील गुन्हेगार स्थागुशा/ चंद्रपुर शहर पोलीसांच्या ताब्यात
दि 09/01/2024 रोजी सकाळी 07:00 वा पो. स्टे. चंद्रपुर शहर येथे माहीती मिळयाले वरून पुलिस निरीक्षक याचे आदेशाने सपोनि मंगेश भोंगाडे सोबत डी. बी. स्टॉफ घटनास्थळी जावुन माहीती घेतली असता फिर्यादी सौ. जयलक्ष्मी बद्रया गादम वय 38 वर्ष रा. श्रीनगर लालपेठ कॉलरी चंद्रपुर, रात्रों आपल्या मुलासह वार्डात राहनार आपल्या आई च्या घरी आपल्या घराला कुलूप लावुन झोपायला गेली. व दुस-या दिवशी दि. 09/01/24 रोजी सकाळी 05.30 वा. परत आपल्या घरी आली असता घराच्या लाकडी दाराची कडी कांन्डा तुटुन दिसला तेव्हा घरात जावुन पाहीले असता घरातील अलमारीत ठेवलेले सोन्याचे दागीने व नगदी रक्कम असा एकुण 53,000/-रु. चा माल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याचे दिसले असे फिर्यादीच्या रिपोर्ट वरून गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्ह्याच्या तपासात अज्ञात आरोपीचा शोध घेत असता दि. 13/01/2024 रोजी स्थानीक गुन्हे शाखाने गुन्हयात चोरी करणार रेकॉर्ड वरील आरोपी आशीष उर्फ आशु श्रीनिवास रेड्डीमंल्ला वय 24 वर्ष, रा. डिस्पेन्सरी चौक रयतवारी कॉलरी चंद्रपुर यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर दाखल गुन्हयात आरोपी कडुन गुन्हयात चोरी गेलेल्या माला पैकी 1) सोन्याचे गळ्यातील नेकलेस 17.850 ग्रॅम किंमत 65,955/-रूपये 2) सोन्याचे कानातील टॉप्स 3. 120 ग्रॅम कि. अंदाजे 11,500/-रूपये असा एकुण 77,455/-रु. चा माल जप्त करून करून आरोपीस पोलीस स्टेशन चंदपुर शहर यांचे ताब्यात दिले. चंद्रपुर शहर पोलीसांनी आरोपीची तीन दिवस पोलीस कोठडी घेवुन सदर गुन्हयातील उरर्वरित माला बाबत कसुन विचारपुस केली असता त्याने सदर माल नागपुर येथे ज्वेलर्सचे दुकानात विकल्याचे सांगितले वरून नागपुर येथे आरोपीसह जावुन गुन्हातील सोन्याचे दागीने किमंत 39,900/- सोन्याचे दागीने किमंत 1,07,660/-रू. असा एकुण 1,47,560/-रू चा माल जप्त करण्यात आला
सदरकार्यवाही पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी , अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु , उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंनदनवार यांचा मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक सतिशसिह राजपुत यांचे नेतृत्वात गुन्हेशोध पथकातील सहाय्य पुलिस निरीक्षक मंगेश भोंगाडे , पुलिस उपनिरीक्षक शरीफ शेख सहाय्यक फौजदार विलास निकोडे , महेंद्र बेसरकर , जयंता चुनारकर , सचिन बोरकर , संतोष पंडीत , निलेश मुडे , चेतन गज्जलवार , इमरान शेख रूपेश रणदिवे , दिलीप कुसराम , संतोष कावडे , भावना यांनी केली आहे.