आशिष रा. यमनुरवार जिल्हा प्रतिनिधी खरे वृत्तांत
राजुरा पत्रकार असोसिएशनला ५० लक्षाचे पत्रकार भवन बांधून देणार.
पत्रकार दिन तथा सत्कार सोहळ्यात पालकमंत्र्यांची घोषणा.
राजुरा पत्रकार असोसिएशन, राजुरा द्वारा दिनांक १३ जानेवारी २०२४ रोज शनिवार ला दुपारी १२ वाजता सम्राट हाल राजुरा येथे पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तथा चंद्रपूरचे पालकमंत्री मा. नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, पत्रकारिता सत्यावर आधारित असावी ती भावना प्रधान असू नये. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या लेखनी व विचारांची ऊर्जा टिकवून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम पत्रकारांनी करावे. आज सोशल मीडिया ही समाजाला दिशा देण्या ऐवजी दशा देत असल्याची खंत व्यक्त केली. राजुरा पत्रकार असोसिएशन च्या मागणीची दखल घेऊन राजुरा पत्रकार असोसिएशनला ५० लक्षाचे पत्रकार भवन बांधून देण्याची घोषणा यावेळी पालकमंत्र्यांनी केली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रमुख अतिथी माजी आमदार अॅड. संजयभाऊ धोटे, जि. प. चे माजी अध्यक्ष देवरावदादा भोंगळे, राजुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. बि. यु. बोर्डेवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आकाश बाजारे, युवा प्रबोधनकार ह भ प प्रशांत मसे, बचत गट संयोजिका शाहीन अब्दुल रऊफ कुरेशी, आरोग्य पर्यवेक्षक उमेश डहाके, क्रीडा प्रशिक्षक पाशा शेख, वनरक्षक सुनील गज्जलवार, सामाजिक कार्यकर्ते बाळनाथ वडस्कर, सुभाष गोरे, केंद्रप्रमुख प्रभाकर जुनघरी, पत्रकार दै. लोकमतचे नितीन मुसळे, दै. सकाळचे मनोज आत्राम, दै. लोकमत समाचार चे एजाज अहमद, दै. महाविदर्भ चे प्रा. प्रफुल्ल शेंडे, लाइव चैनल चे संतोष कुंदोजवार आदी मान्यवरांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजुरा पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण गोरे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव एजाज अहमद यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले. यावेळी राजुरा आणि परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोहळ्याचे आयोजक तथा राजुरा पत्रकार असोसिएशन राजुराचे अध्यक्ष श्रीकृष्ण गोरे, सचिव एजाज अहमद, उपाध्यक्ष संतोष कुंदोजवार, उपाध्यक्ष प्रा. प्रफुल्ल शेंडे, कार्याध्यक्ष मंगेश बोरकुटे, कोषाध्यक्ष सय्यद जाकीर, सहसचिव साहिल सोळंके, सदस्य वसंत पोटे, मनोज आत्राम, फारुख शेख, शहनवाज कुरेशी, अमित जयपुरकर, सागर भटपल्लीवार, उमेश मारशेट्टीवार, मंगेश श्रीराम, बंडू वनकर, प्रकाश काळे, अविनाश दोरखंडे आदींनी परिश्रम घेतले.