ओम अमर, नागपूर पुरूष गटात तर साई काटोल महिला गटात प्रथम पुरस्काराचे मानकरी

0
174

आशिष रा यमनुरवार जिल्हा प्रतिनिधी खरे वृत्तांत

 

 

ओम अमर, नागपूर पुरूष गटात तर साई काटोल महिला गटात प्रथम पुरस्काराचे मानकरी.

 

आमदार चषक कबड्डी स्पर्धेचा समारोप : आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते बक्षीस वितरण.

 

आमदार सुभाषभाऊ धोटे मित्र मंडळ, राजुरा क्लब, सेवा कलश फाउंडेशन राजुरा द्वारा दिनांक ५ ते ७ जानेवारी २०२४ रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, राजुरा येथे आयोजित विदर्भ स्तरिय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचा समारोप तथा बक्षीस वितरण समारंभ दि. ७ जानेवारी ला सायंकाळी आमदार सुभाष धोटे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला. या स्पर्धेत नागपूर, काटोल, मोहाडी, अजनी, अकोला, उमरेड, हिंगणघाट, वाशीम, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, पुलगाव, वर्धा, वरोरा, नागरी, आर्वी, चंद्रपूर, गडचिरोली, बल्लारपूर येथील पुरुष गटातील ४० आणि महिला गटातील २० संघांच्या कबड्डी खेळाडूंनी रोमहर्षक खेळ कोशल्याचे प्रदर्शन केले.

यात पुरुष गटात प्रथम पुरस्कार ओम अमर क्रीडा मंडळ, नागपूर स्व. रामचंद्रराव धोटे, माजी आमदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आ. सुभाष धोटे यांचे तर्फे ७१ हजार रू. रोख व चषक, द्वितीय पुरस्कार संत. गाडगे बाबा क्रीडा मंडळ, अमरावती स्व. मल्लीकाताई येरोलवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वामीजी येरोलवार, माजी नगराध्यक्ष यांचे तर्फे ५१ हजार रु. रोख व चषक, महिला गटात प्रथम पुरस्कार साई क्रीडा मंडळ, काटोल स्व. प्रभाकरराव मामुलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रीमती सुमनताई मामुलकर यांचे तर्फे ५१ हजार रु. रोख व चषक, द्वितीय पुरस्कार रवींद्र क्रीडा मंडळ उमरेड स्व. सुधाकरराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुनिलभाऊ देशपांडे, माजी उपनगराध्यक्ष यांच्या तर्फे ३१ हजार रु. रोख व चषकाचे मानकरी ठरले तर दोन्ही गटात विविध वैयक्तिक पुरस्कार प्राप्त खेळाडूंना आ. सुभाष धोटे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, स्वामी येरोलवार, बल्लारपूर चे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदाणी, माजी नगरसेवक भाष्कर माकोडे, अशोकराव देशपांडे, अॅड. सदानंद लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, कृ. उ. बा. स. सभापती विकास देवाळकर, संचालक तिरुपती इंदुरवार, जगदीश बुटले, रामभाऊ देवईकर, रामभाऊ ढुमणे, महिला काँ. तालुकाध्यक्षा निर्मला कुळमेथे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, माजी सभापती कुंदा जेणेकर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जैन, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, गजानन भटारकर, पंढरी चन्ने, जिल्हा कबड्डी संघाचे सचिव प्रशांत करडभाजने, कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू कुणाल चहारे, सेवा कलश फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे, सचिव शंतनू धोटे उपस्थित होते. स्पर्धा व कार्यक्रमाचे संचालन एजाज अहमद, प्रा. प्रफुल्ल शेंडे, छोटुलाल सोमलकर, चरणदास झाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर, नर्स, कंपाऊंडर, अ‍ॅम्ब्युलन्स चालक, पोलीस कर्मचारी, आयोजन समिती अंतर्गत सर्व समितीचे प्रमुख, सदस्य यासह अनेकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने क्रीडा प्रेमी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here