उद्याला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त १२जानेवारीला चंद्रपूरात पत्रकार संवाद कार्यक्रम

0
44

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे
राष्ट्रीय युवा दिनानिमित्त १२जानेवारीला चंद्रपूरात पत्रकार संवाद कार्यक्रम.
—————————————-
काळानुरूप बदलती पत्रकारिता व आव्हाने!
(सफरनामा :सामाजिक -पत्रकारितेचा) वेचक आणि वेधक अनुभव यावर मार्गदर्शन

—————————————-
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ
(कार्यक्षेत्र- संपूर्ण भारत )महाराष्ट्र प्रदेश, चंद्रपूर सहयोगी जिल्ह्याच्या वतीने शुक्रवार दिनांक १२ जानेवारी २०२४ ला सकाळी १०.३० वाजता, स्थळ श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम वडगांव, सोमय्या पॉलिटेक्निक जवळ चंद्रपूर येथे राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंती तथा मराठी पत्रकारितेचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ जयंती निमित्त आयोजित, पत्रकार संवाद कार्यक्रमात “काळानुरूप बदलती पत्रकारिता व आव्हाने” सफरनामा: सामाजिक व पत्रकारिता वेचक आणि वेधक अनुभव यावर पत्रकार संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे. याप्रसंगी मान्यवर अतिथी गण म्हणून प्रमुख मार्गदर्शक पत्रकार संवाद कार्यक्रमाचे अध्यक्ष राम आखरे, भारतीय सेवा मंडळ संस्थापक -अध्यक्ष, जनमंच सदस्य, संचालक(RTI )माहिती प्रशिक्षण केंद्र नागपूर राहणार आहेत तर प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून प्रा .सुरेश चोपणे, माजी सदस्य केंद्रीय वने, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय ,दिल्ली तथा अध्यक्ष, ग्रीन प्लानेट सोसायटी, पर्यावरण संस्था ,चंद्रपूर राहतील तर पत्रकारिता इलेक्ट्रॉनिक्स मीडियातील झी २४न्यूज मराठी ,चंद्रपूर -गडचिरोली प्रतिनिधी आशीष अब्माडे संबंधित विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार- संवाद कार्यक्रमाचे निमंत्रक अतिथी म्हणून रवींद्र तिराणिक महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख ,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हे प्रामुख्याने उपस्थित राहतील. सदर पत्रकार -संवाद कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश, सहयोगी जिल्हाध्यक्ष कार्यकारणी व तालुका कार्यकारणी पदाधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here