जगदज्योती महात्मा बसवेश्वर आणि संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना
Ø गुरव आणि लिंगायत समाजाला महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर,दि. 11 : गुरव समाजासाठी संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ आणि लिंगायत समाजासाठी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना दि. 9 ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे. या दोन्ही महामंडळाचे कामकाज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत कार्यान्वित करण्यात आले आहे.
सदर महामंडळाच्या विविध योजना असून योजनांच्या अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय दूध डेअरी रोड, जलनगर वार्ड, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा 07172-262420 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संजय देशमुख यांनी केले आहे.
00000