आशिष रा. यमनुरवार जिल्हा प्रतिनिधी खरे वृत्तांत
- आमदार चषक कबड्डीचे थाटात उद्घाटन : सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी ची हजेरी.
आ. सुभाष धोटे मित्र मंडळ, सेवा कलश फाउंडेशन व राजुरा क्लब द्वारा आयोजन.
आमदार सुभाषभाऊ धोटे मित्र मंडळ, राजुरा क्लब, सेवा कलश फाउंडेशन राजुरा द्वारा दिनांक ५ ते ७ जानेवारी २०२४ रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, राजुरा येथे आयोजित विदर्भ स्तरिय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे च्या पटांगणावर पहायला मिळणार आहेत. दि. ५ जानेवारी ला सायंकाळी ७ वाजता लोकप्रिय आ. सुभाष धोटे यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली मराठी सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी व गनमान्य अतिथींच्या उपस्थितीत एका दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन पार पडले. या स्पर्धेत नागपूर, काटोल, मोहाडी, अजनी, अकोला, उमरेड, हिंगणघाट, वाशीम, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, पुलगाव, वर्धा, वरोरा, नागरी, आर्वी, चंद्रपूर, गडचिरोली, बल्लारपूर येथील पुरुष गटातील ४० आणि महिला गटातील २० संघांचा समावेश असून दोन्ही गटात अनेक पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले, संचालन व आभार प्रदर्शन मोहन मेश्राम यांनी केले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, स्वामी येरोलवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, अशोकराव देशपांडे, अॅड. सदानंद लांडे, अॅड. अरूण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू कुणाल चहारे, सेवा कलश फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे, सचिव शंतनू धोटे, सभापती विकास देवाळकर, नंदकिशोर वाढई, दिनकर कर्नेवार, साईनाथ बत्कमवार, तिरुपती इंदुरवार रामभाऊ ढुमणे, महिला काँ. तालुकाध्यक्षा निर्मला कुळमेथे, आशा खासरे, संध्या चांदेकर, गजानन भटारकर, नरेश मुंदडा, क्रिष्णा खामनकर, चंद्रशेखर चांदेकर, शैलेश लोखंडे यासह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.