आशिष रा. यमनुरवार जिल्हा प्रतिनिधी खरे वृत्तांत
किरमिरी येथे सावित्रीबाई फुले जयंती मोठया उत्साहात साजरी….… गोंडपीपरी तालुक्यातील वर्धा नदीकाठी वसलेल्या किरमिरी या छोट्याशा गावात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत आम्रपाली महिला सक्ष्मीकरण समिती तर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्त्री सक्षमीकरण करण्याकरिता विविध सांस्कृतिक, औपचारिक,वक्तृत्व,रेकॉर्डिंग डॉन्स करण्यात आले.यात गोंडपीपरी चे वर्ग 10वि जनता विद्यालयात शिकणारा जिल्हात डोन्स मध्ये प्रथम क्रमांक पटकावनारा आयुष् राऊत यांचे चार डॉन्स कार्यक्रमात खूप वेगळे वळण लावले.प्रमुख पाहुण्यांमध्ये ऍड.सौ.अरुना जांभुडकर मॅडम यांनी महिला ही पुरुषाच्या तुलनेत अधिक सक्षम आहेत असे मत मांडले तर माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.वैष्णवीताई बोडलावर मॅडम यांनी मोदी सरकार स्त्रीयांसाठी विविध योजना राबवून स्त्रियांना जास्त गतिमान करण्यास उत्तेजन करीत आहेत असे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात उद्घाटक म्हणून मा जि.प.सदस्य सौ वैष्णवीताई अमर बोडलावार ,तर अध्यक्ष स्थानी ॲड अरूणाताई जांभूळकर होते.प्रमुख पाहुणे म्हणून सूनिताताई सोनवणे,किरण डोंगरे,ताई निखाडे, सुमित्रा पेरगुडवार,प्रतिमा झाडे, गिरडकर सर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे उदगाती तथा सूत्रसंचालन म्हणून किरमिरी गावच्या उपसरपंच सौ स्वीटीताई मोहन डोंगरे यांनी केले. विद्या हे धन आहे रे। श्रेष्ठ साऱ्या धनाहून
तिचा साठा जयापाशी। ज्ञानी तो मानती जन।
विद्या हे धनापेक्षा श्रेष्ठ आहे याचे महत्व आपल्या कृतीतून सिद्ध करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती, ज्ञानज्योती #सावित्रीबाई_फुले_यांच्या_जयंतीनिमित्तसवित्रीमाईच्या फोटोला_विनम्र_अभिवादन किरमिरी ग्रामवासीयांनी केली.