*चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत बाईक व स्टॅन्ड घड्याळ चोरी घटनेतील आरोपीकडून 3600 रुपयाचा मुद्देमाल जप्त*
१) पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथे दिनांक २६/१२/२०२३ रोजी अप क. ८२०/२३ क. ४५७,३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल असुन थोडक्यात हकिकत याप्रमाणे की घटना ता. वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी नामे सागर गोंडूप्रसाद दामीया वय ३२ वर्ष, धंदा रेडीयो टेक्नालॉजीस्ट, रा. जटपुरा गेटजवळ चंद्रपुर हे डॉ. अल्लुरवार हॉस्पीटल येथील ड्युटी करून हॉस्पीटल मधील रेस्ट रूममध्ये आराम करित असताना रात्रों दरम्यान कोणीतीरी अज्ञात चोराने डॉक्टर साहेब यांचे चेंबरमधील एक स्टॅन्ड घड्याळ कि. अं. १००० रू. हि चोरून नेली. तेव्हा सिसीटिव्ही फुटेज चेक केले असता, एक अनोळखी ईसम विद्युत घडी चोरून नेत आहे, असे दिसले. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
२) पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथे दिनांक २४/१२/२०२३ रोजी अप क. ८२१/२३ क. ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल असुन थोडक्यात हकिकत याप्रमाणे की घटना ता. वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी नामे सुरेश मारोती लष्कर वय ४९ वर्ष, धंदा ठेकेदारी, रा. वार्ड नं. ३ दुर्गापुर चंद्रपुर हे राजकला टॉकीज येथे पिक्चर पाहण्यास गेले असता, आपली जुनी वापरती मो.सा. होन्डा शाईन क. एम. एच. ३४, सि.बी. ९२८८ कि.अं. ३५००० रू. ची कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेली. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला
नमुद गुन्ह्याचे गांर्भीय बघता मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर नंदनवार साहेब, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतिशसिंह राजपुत पो.स्टे. चंद्रपुर शहर यांचे मार्गदर्शनात गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेउन पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथील डी.बी पथक मधील सपोनि मंगेश भोंगाळे, पो.उप.नि. शरिफ शेख तसेच डि.बी. कर्मचारी असे पो.स्टे. परिसरात रवाना होवुन गुप्त बातमीदाराच्या व सिसीटिव्ही फुटेजच्या आधारे आरोपीस ताब्यात घेवुन खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीचे नाव :- इक्बाल आशिकहुसैन पंढरपुरवाला, वय ६३ वर्ष, जात बोहरा, धर्म ईस्लाम, रा. नेहरू शाळेजवळ, घुटकाला वार्ड चंद्रपुर.
अप.क. ८२०/२०२३ कलम ४५७,३८० भादंवि
जप्त माल :- १) एक स्टॅन्ड घड्याळ कि. अं. १००० रु.
अप.क. ८२१/२०२३ कलम ३७९ भादंवि
जप्त माल :- १) होन्डा शाईन एम. ३४ सि.बी. ५२८८ कि. अं. ३५०० रु.
असा एकुण ३६,०००/- रू. चा माल जप्त करण्यात आला
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. रविंद्रसिंग परदेशी सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, श्री. सुधीर नंदनवार सा. यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपुर शहर पोलीस निरीक्षक श्री. सतिशसिंह राजपुत, सपोनि. मंगेश भोंगाडे, पोउपनि शरिफ शेख, स. फौ. विलास निकोडे, पो. हवा. महेंद्र बेसरकर, पो. हवा. जयंता चुनारकर ब.नं. ८९८, पोहवा. संतोष पंडीत, पोहवा. सचिन बोरकर, पो. हवा. निलेश मुडे, म.पो. हवा. भावना रामटेके, नापोशि. चेतन गज्जलवार, पो. अं. इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, ईरशाद शेख, रूपेश रणदिवे यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्यातील पुढील तपास पोउपनि. शरिफ शेख, स. फौ. विलास निकोडे करीत आहे.