*राज्य मराठी पत्रकार संघाचा अभिष्टचिंतन सोहळा १ जानेवारी रोजी*
*भद्रावती येथे विविध उपक्रमांचे आयोजन*
भद्रावती,दि.३१(तालुका प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष वसंत मुंडे आणि राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य
साधून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून १ जानेवारी रोजी भद्रावती येथे जिल्हा शाखा चंद्रपूर व तालुका शाखा भद्रावती तर्फे अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भद्रावती येथील स्थानिक आशीर्वाद मंगल कार्यालयात सकाळी ११:३० वाजता आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांचे हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष निलेश सोमानी, विदर्भ उपाध्यक्ष अनुपकुमार भार्गव, भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, प्रसिद्ध उद्योजक नरेश जैन, शिक्षण तज्ज्ञ प्रा. नाहिद हुसेन, भा.ज.यु.मो. प्रदेश सचिव करण देवतले, काँग्रेस प्रदेश सचिव शिवा राव, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या अभीष्टचिंतन सोहळ्यात दिनदर्शिका प्रकाशन, गुणवंतांचा सत्कार,पदाधिकारी मेळावा, अंध-अपंग विदयार्थी यांना साहित्य वाटप इत्यादी उपक्रम पार पडणार असून या सोहळ्यात जिल्यातील व तालुक्यातील पदाधिकारी, सदस्य उपस्थित राहणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यात राज्य पत्रकार संघातर्फे साजरा करण्यात येतो. यानिमित्य विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात अशी माहिती
विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांनी दिली आहे.
भद्रावती तालुका अध्यक्ष शंकर बोरघरे, सरचिटणीस शाम चटपल्लीवर, जिल्हा संघटक रुपचंद धारणे व तालुका शाखेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या पुढाकारातून जिल्हा शाखेच्या मार्गदर्शनात हा सोहळा संपन्न होत आहे.