आशिष रा. यमनुरवार जिल्हा प्रतिनिधी खरे वृत्तांत
*माजी विद्यार्थ्यांच्या वतीने स्पर्धा परीक्षा आणि शिष्यवृत्ती योजना यावर मार्गदर्शन*
*शरदराव पवार महाविद्यालयांचे आयोजन*
गडचांदुर् -येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी समितीच्या वतीने विद्यमान विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा आणि शिष्यवृत्ती योजनेवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले
यावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालय गडचांदुर येथील प्रभारी प्राचार्य प्रा.नानेश्वर धोटे यांनी स्पर्धा परीक्षा याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. परीक्षेत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमावर चर्चा केली. प्रामाणिक आणि कठोर मेहनतीमुळे स्पर्धा परीक्षा नक्कीच पास होऊ शकते असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला
स्पर्धा परीक्षा बाबतच्या विविध पदांविषयी मुलाखती विषयी त्याचबरोबर अभ्यासक्रमाच्या आणि अभ्यासाच्या पद्धती यावर त्यांनी आजी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सुरेश गावंडे यांनी शासनाकडून मिळत असलेल्या विविध शिष्यवृत्ती योजना बाबत विद्यार्थ्यांना अवगत केले त्यांनी विद्यार्थ्यांना विविध जातीनिहाय शिष्यवृत्ती,एचपीसीएल शिष्यवृत्ती, तसेच शाहू महाराज शिष्यवृत्ती इत्यादी बाबत विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण माहिती दिली यावेळी पदवीच्या तिन्ही वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्पर्धा परीक्षा आणि शिष्यवृत्ती योजनेच्या बाबतच्या अडचणी विचारून सर्व अडचणीचे निरसन केले आहे.
यावेळी महाविद्यालयाच्या वतीने माजी विद्यार्थी प्रा. नानेश्र्वर धोटे आणि सुरेश गावंडे यांचे माजी विद्यार्थी समितीचे समन्वयक डॉ.संजय गोरेआभार मानले.