आशिष रा. यमनुरवार जिल्हा प्रतिनिधी खरे वृत्तांत
*शासनाचा राज्य पुरस्कारएपीआय निलेश पिंपळशेंडे यांचा सत्कार*
कोरपना – गडचांदूर येथील शरदराव पवार कला-वाणिज्य महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सहायक पोलिस निरीक्षक निलेश पिंपळशेंडे यांचा फ्रेंड्स गृप शरद पवार महाविद्यालय, गडचांदूरच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
त्यांना पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यातर्फे महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षण संस्थांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रशिक्षकांना दिला जाणारा उत्कृष्ट पोलीस प्रशिक्षक पुरस्कार – २०२३ नुकताच जाहीर झाला. ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर येथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सन्मानचिन्ह देऊन माजी विद्यार्थी तथा मित्रमंडळींनी सत्कार केला.
यावेळी शरद पवार महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष प्रा. आशिष देरकर, किशोर बोढे, राजू जेनेकर, नंदकिशोर डाहुले, गजेंद्र काकडे, ज्योती डाहुले, पौर्णिमा काकडे, कुंता भांडारवार, अर्चना खारकर, स्वाती देरकर, वैशाली पिंपळशेंडे, प्राची पिंपळशेंडे आदी उपस्थित होते.