*आशिष रा. यमनुरवार जिल्हा प्रतिनिधी खरे वृत्तांत*
मा ना नरेंद्र जी मोदी यांचा संकल्पनेतून ,मा. ना सूधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनातून आत्मनिर्भर भारताचा निर्मितीसाठी देशभरात राबविण्यातआलेल्या **बेटी बचाव बेटी पढावो** अभियानांतर्गत ऑनलाईन रांगोळी स्पर्धा घेण्यात आले.त्यात चंद्रपूर जिल्ह्य़ातील राजूरा विधानसभा क्षेत्रात, गोंडपिपरी तालुक्यातील सहभागी सर्व स्पर्धकांना मा. जि.प.सदस्य मा. अमर बोड्लावार यांचा वाढदिवसानिमित्त प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.आणि तालुक्यातील प्रथम पारितोषिकाचे मानकरी सौ निलिमाताई कोल्हापूरे , द्वितीय क्रमांक श्रीमती वर्षाताई कोडमलवार , सौ रोशनीताई अनमूलवार यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र मा.जि.प.सदस्य सौ
वैष्णवीताई बोडलावार व गोंडपिपरी तालूक्याचे भाजपा महिला अध्यक्ष मा. सूरेखाताई श्रीकोंडावार यांचा हस्ते देण्यात आले.तसेच राजूरा विधानसभा स्तरावर तृतीय क्रमांक गोंडपिपरी तालुक्यातील, भंगाराम तळोधीचे स्पर्धक सौ निलिमाताई सूनिल कोल्हापूरे यांना मिळाले. सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी तालूक्याचे सर्व भाजपा पदाधिकारी सौ लक्ष्मीताई सोमेश्वर बालूगवार सरपंच भंगाराम तळोधी, सौ संजनाताई अम्मावार, संचालक कृ उ बा समिती गोंडपिपरी,सौ कंचन गरपल्लीवार,श्रीमती नंदाताई घोगरे सरपंच धाबा,सौ अर्चनाताई कावळे,ममताताई कोवे, नम्रताताई बारसागडे,सर्व ग्राम पंचायतचे सदस्य,पपीताताई कोडापे मा सदस्य ग्रा. पं.धाबा,ईतर मान्यवर व मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.