*आशिष रा. यमनुरवार जिल्हा प्रतिनिधी खरे वृत्तांत*
*शरदराव पवार महाविद्यालयात माजी विद्यार्थी कार्यकारिणी सभा संपन्न*
गडचांदूर – शरदराव पवार महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांची कार्यकारिणीची सभा आयोजित करण्यात आली. या सभेत 16 आणि 17 जानेवारी 2024 मध्ये महाविद्यालयात येणाऱ्या नॅक मूल्यांकन समिती बरोबर माजी विद्यार्थ्याची संवाद सभा आयोजित करण्यात येणार असून यावर कार्यकारणी मध्ये विशेष चर्चा करण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी सदर महाविद्यालय प्रगती पथावर असून अनेक चांगल्या सुविधा महाविद्यालयाने केल्या असल्याने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची प्रशंसा केली. मागील वर्षी माजी समितीच्या वतीने ‘लोकशाही आणि आव्हाने’ या विषयावर विद्यार्थ्यांचे चर्चासत्र घेण्यात आले होते. यावेळी भविष्यातील विविध उपक्रम माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यासोबत अभ्यासक्रम आणि रोजगार व भविष्यकालीन उच्च शिक्षणाबाबत चर्चा केली. तसेच येत्या 10 जानेवारी 2024 ला माजी विद्यार्थी सभा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष प्रा. आशिष देरकर, उपाध्यक्ष प्रा. प्रदीप परसुटकर, सचिव सतीश बेतावार, कोषाध्यक्ष शशिकांत ढोकणे, सहसचिव उमेश राजुरकर, प्रणाली ताजने, नूतन मेंढी, अंकित चन्ने, प्रफुल मानकर तसेच समन्वयक डॉ.संजय गोरे उपस्थित होते.