*आशिष रा. यमनुरवार जिल्हा प्रतिनिधी खरे वृत्तांत*
*आशिष देरकर यांची विदर्भ अर्थ-वाणिज्य शिक्षक मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड*
को
कोरपना – येत्या ५ व ६ जानेवारीला नागपूर येथे होणाऱ्या अर्थ-वाणिज्य शिक्षक मंडळाच्या द्वैवार्षिक चर्चासत्राच्या संदर्भात पूर्व तयारीसाठी चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयात नुकतीच बैठक पार पडली.
बैठकीत महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथील अर्थशास्त्राचे प्रा. आशिष देरकर यांची अर्थ-वाणिज्य शिक्षक मंडळाच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
विदर्भ अर्थ-वाणिज्य शिक्षक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. एच.एच. हुड्डा यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक घेण्यात आली. यावेळी मंडळाचे माजी सचिव राजाभाऊ दुरुगकर, मंडळाचे मार्गदर्शक तथा सी. पी. बेरार कॉलेज नागपूरचे संचालक प्रा. हिमते, विजुक्टाचे अध्यक्ष तथा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष डॉ.अशोक गव्हाणकर, सचिव डॉ.चेतन हिंगणेकर, विजुक्टाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रवीण चटप यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी प्रा. योगेश्वर नागोसे, सचिव प्रा. दिनकर झाडे, कोषाध्यक्ष प्रा. दिवाकर मोहितकर, सहसचिव प्रा. अलोक खोब्रागडे, प्रा. कविता नवघरे तर सदस्यपदी प्रा. राकेश डोंगरकर, प्रा. प्रशांत बल्की, प्रा. महेश मालेकर, प्रा. संजय बाबरे, प्रा. नरेंद्र हेपट, प्रा. मयूर वलके, प्रा. प्रशांत मत्ते, डॉ. आशिष कुबडे आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली. नागपूर येथे होणाऱ्या अर्थ वाणिज्य शिक्षक मंडळाच्या द्वैवार्षिक चर्चासत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त कनिष्ठ महाविद्यालयातील अर्थ-वाणिज्य विषयाच्या शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक गव्हाणकर यांनी केले.