भाविकांनी नियम पाळून जोगापूर हनुमानजीचे दर्शन घ्यावे :  आमदार सुभाष धोटे.

0
73

*आशिष रा. यमनुरवार जिल्हा प्रतिनिधी खरे वृत्तांत*

 

भाविकांनी नियम पाळून जोगापूर हनुमानजीचे दर्शन घ्यावे :

आमदार सुभाष धोटे.

 

राजुरा (ता. प्र) :– राजुरा तालुक्यातील भाविकांचे श्रधास्थान असलेले हनुमान मंदीर देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे मार्गशीस महिन्यात भावीक मोठ्या आस्थेने हनुमाननजीच्या दर्शनाला येत असतात याही वर्षी मार्गशीस महिन्यात सुरु होणाऱ्या जोगापूर यात्रेसंदर्भात राजुरा वनविभागाच्या विश्रामगृहात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली जोगापूर देवस्थान येथे मार्गशीर्ष महिन्यात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसंदर्भात नियमावली ठरविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, व्यापारी, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी यांची समन्वय सभा पार पडली. यात जोगापूर देवस्थान येथे जाणाऱ्या भाविकांसाठी आदर्श नियमावली, प्रवास, पाणी, आरोग्य, सुरक्षा इत्यादी सुविधांबाबत आढावा घेण्यात आला.

यावेळी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी सर्वांचे मते, सुचना ऐकून विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना जोगापूर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सर्व आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले, तसेच येथे वास्तव्यास असलेल्या वाघ, बिबटे आणि अन्य वन्यजीव प्राण्याचा वावर लक्षात घेता भाविकांनी प्रशासकीय नियम पाळून जोगापूर हनुमानाचे दर्शन घ्यावे असे आवाहन केले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सूरेश येलकेवाड यांनी जोगापूर यात्रेसंदर्भात वनविभागासह विविध विभागांकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा सादर केला.

या प्रसंगी आमदार सुभाष धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, सतीश धोटे, साईनाथ बत्कमवार, संदीप जैन, प्रभाकर ढवस, कपिल इद्दे, प्रा. राजेश खैरानी, संतोष इंदुरवार, बादल बेले, चेतन जयपुरकर, तहसिलदार ओमप्रकाश गौड, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, प्रभारी उपविभागीय वनाधिकारी संदीप लगडे, मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी सूरेश येलकेवाड आदि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here