सोनार बहुउद्देशीय संस्थेतर्फे श्री संत नरहरी महाराज जीवनावर आधारित कटिबंध चित्रपटा आयोजन*

0
181

*आशिष रा. यमनुरवार जिल्हा प्रतिनिधी खरे वृत्तांत*

 

*सोनार बहुउद्देशीय संस्थेतर्फे श्री संत नरहरी महाराज जीवनावर आधारित कटिबंध चित्रपटा आयोजन*

श्री संत नरहरी सोनार यांचा जन्‍म देवगिरी येथे झाला. नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील संत नरहरी सोनार प्रथम शैवपंथी होते. संत नरहरी सोनाराच्या नावावर फार थोडे अभंग उपलब्ध आहेत. ‘सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई’ , ‘शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा’ , ‘माझे प्रेम तुझे पायी’ आणि ‘ देवा तुझा मी सोनार ‘ अभंग प्रसिद्ध आहेत. अशातच या संत समुदायातील सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत श्री संत

नरहरी सोनार यांच्या जीवनावर कटिबंध नावाचा मराठी चित्रपट आहे. त्याचे लेखन नवनाथ पवार यांनी केले असून, दिग्दर्शन मुकुंद भुजबळ यांचे आहे. निर्मिती संजय जाधव यांची आहे. रमेश औटी यांनी उत्कृष्ट संपादन पार पाडले. हा चित्रपट २४ डिसेंबर २०२४ रोजी *सोनार समाज बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर* यांच्या सौजन्याने प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे एक ते पाच या वेळेपर्यंत दाखविण्यात येणार आहे या चित्रपटाच्या माध्यमातून सर्व शाखेतील सोनार समाजातील लोकांना उपस्थित राहून श्री संत नरहरी महाराजां बद्दल वास्तुस्थिती समजावी या उद्देशाने सदर चित्रपटाचे आयोजन करण्यात आले आहे या चित्रपटाच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना एकछत्र छाये खाली आणून संघटित करून सामाजिक विकासावर भर घालण्याचा दृष्टिकोन ठेवून सोनार समाज बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर द्वारे सदरहू संत श्री नरहरी सोनार यांच्या जीवनावर *कटिबंध* नावाचा मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहे सर्वांनी सहपरिवार या चित्रपट बघण्याकरिता आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रपूर सोनार समाज बहुउद्देशिय संस्था यांनी केलेले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here