सिंदेवाही तालुका पत्रकार संघाकडून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन
सुनिल गेडाम सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही:सिंदेवाही तालुका पत्रकार कार्यालयात सिन्देवाही येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 6 डिसेंबर ‘महापरिनीर्वान दिन’ तथा ‘समाजिक समरसता दिन’ निमीत्य माल्याअर्पन करुन प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला व 6 डिसेंबर 1956 रोजी ते अनंतात विलीन झाले. त्या दिवसाला संपूर्ण जग ‘महापरिनीर्वान दिन’ म्हणून साजरा करतो तथा ‘समाजिक समरसता दिन’ दिन म्हणून साजरा करीत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले जाते. आपल्या संपूर्ण आयुष्यात बाबासाहेबांनी दलीतांसाठी विस्तृत व महान कार्य केले तसेच जगातील सगळ्यात मोठी व विस्तृत राज्यघटना तयार करुन ‘राज्यघटनेचे शिल्पकार’ असे नाव लौकीक प्राप्त केले. अशा महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तालुका पत्रकार संघातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी सिंदेवाही तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कामतवार, उपाध्यक्ष मिथुन मेश्राम, सचिव महेंद्र कोवले, आक्रोश खोब्रागडे,सचिन रामटेके, प्रविण नागदेवते, अमान कुरैशी, अमोल निनावे, सुनिल गेडाम हे पदाधिकारी उपस्थित होते.