*वनविकास महामंडळ कर्मचाऱ्यांच्या व सेवानिवृत्त कर्मचाचारी यांचा अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात*
चंद्रपूर:- शिफारीश करण्यात आलेल्या व प्रत्यक्षात लागु करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाची थकबाकी वनविकास महामंडळ येथे काम करणाऱ्या, सेवानिवृत्त कर्मचारी तथा कर्मचाऱ्यांना त्वरीत देण्यात यावी यासाठी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ कर्मचारी संघटनेणे तर्फे चंद्रपूर येथील वनप्रकल्प विभागाच्या कार्यालयासमोर दिनांक एक डिसेंबर 2023 पासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.
या आंदोलनात चंद्रपूर वनविकास महामंडळ सेवानिवृत्त कर्मचारी व कर्मचारीवर्ग सहभागी झाले आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे दिनांक १जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागु करण्यात आला आहे.
मात्र वनविकास महामंडळ या कर्मचार्यानां हा सातवा वेतन आयोग प्रत्यक्षात जुलेै २०२१पासून लागु करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाकडे यातील फरकाची थकबाकी आहे. ती अद्याप देण्यात आली नाही.
यासाठी संघटनेव्दारा हि थकबाकी मिळावी यासाठी वेळोवेळी मागणी करण्यात आली.
मात्र याकडे शासनातर्फे सतत दुर्लक्ष करण्यात आले.
शेवटी हि थकबाकी मिळण्यासाठी शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेतर्फे सदर अन्नत्याग आंदोलन पुकारण्यात आले आहे.
या आंदोलनाची शासनाने त्वरित दखल घेऊन सातव्या आयोगाची थकबाकी वनविकास महामंडळ विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना व सेवा देत असणार्या कर्मचार्यांना देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांतर्फे करण्यात येत आहे.