9 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

0
48

9 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

चंद्रपूर, दि.28 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनात दि. 9 डिसेंबर 2023 रोजी चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे.

 

झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे. लोक न्यायालयाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने व सर्वसंमतीने त्वरित समक्ष निकाल केला जातो व त्या आदेशाला दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनामा एवढेच महत्व असते, व त्याची अंमलबजावणी सुध्दा करता येते. त्याव्दारे वेळ, पैसा, श्रमाची बचत होते. वादांचा कायमचा सामोपचाराने निपटारा होतो, सर्वच पक्षांना जिंकल्याचे समाधान मिळत असल्याने भविष्यकालीन वाद टाळले जातात. या कार्यवाहीसाठी वेगळा शुल्क, खर्च लागत नाही.

 

चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह,जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येत असलेल्या या लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित दिवाणी, फौजदारी, कलम 138 एन.आय अॅक्ट (धनादेश न वटणे), बँकांची कर्ज वसूली आदी प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, जमीन अधिग्रहण अर्ज, कामगार कायद्याखालील प्रकरणे,घरमालक-भाडेकरू वाद, कौटुंबिक वाद (विवाह-विच्छेदन वगळता), इलेक्ट्रीसिटी अॅक्टचे समझोतायोग्य वाद तसेच न्यायालयात येण्याअगोदरची (प्रि-लिटीगेशन) प्रकरणे, महसूल, पाणीपट्टी, वीजबिल आपसी समझोत्याकरीता ठेवून ती सामंजस्याने सोडविण्याबाबतचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी यांनी केले आहे.

 

अधिक माहितीसाठी तसेच ज्या नागरिकांना आपली प्रकरणे लोक अदालती मध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथे स्वत: येऊन किंवा हेल्पलाईन क्रमांक 07172-271679, कार्यालयीन मोबाईल क्र. 8591903934 वर संपर्क साधावा. तसेच विधीज्ञ, पक्षकार व नागरिकांनी या लोकअदालतीत उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

०००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here