जिल्हा परिषद हायस्कुल राजुराचे माजी विद्यार्थी आले चोवीस वर्षांनी एकत्र.
– शिक्षकांप्रति व्यक्त केली कृतज्ञता. शाळेच्या गणवेशात भरवली शाळा.
राजुरा:
सन १९९८-९९ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनीं तब्बल चोवीस वर्षांनी एकत्र येऊन स्नेह संमेलनाचे आयोजन करून शिक्षकांचा सत्कार केला व शिक्षकांसोबत जुन्या आठवणीना उजाळा देत कृतज्ञता व्यक्त करीत शाळेच्या गणवेशात शाळा भरवली आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.
हे विध्यार्थी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील माजी शासकीय जिल्हा परिषद हायस्कूल राजुरा चे आहेत. तब्बल चोवीस वर्षांनी ह्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्नेहसंमेलनाचे आयोजन करून त्यांना १९९८-९९ साली शिकविणाऱ्या शिक्षकांना सुद्धा निमंत्रण दिले. सर्व विद्यार्थी शाळेच्या गणवेशात शाळेत उपस्थित होते. शिक्षकांसोबतच्या जुन्या आठवणी, शाळेत घालवलेल्या त्या दिवसांवर चर्चा ह्या स्नेहसंमेलनात झाल्या. मुख्य म्हणजे शिक्षकांना तसेच उपस्थित विद्यर्थिन्ना 24 वर्ष जुन्या शाळेतल्या गोष्टी अजूनसुद्धा आठवणे हे कमालीचे.
या स्नेहसंमेलन व शिक्षकांचा सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषद माजी शासकीय विद्यालायाचे प्राचार्य उईके होते. तर प्रमुख अतिथी म्हणून १९९८-९९ ब्याच चे शिक्षक रामभाऊ वैरागडे , इत्तडवार सर, उमरे सर, कोठारे सर, द्दुर्ग सर, मुसळे सर, श्रीमती डाहुले ताई, श्रीमती येमूलवार ताई व श्रीमती सूर्यवंशी ताई उपस्थित होत्या. ह्या प्रसंगी सर्व शिक्षकांनी आपापले मनोगत व्यक्त करून जुने शिक्षण व आजचे शिक्षण बद्दल चे महत्वाचे अर्थ समजावून दिले. २४ वर्ष नंन्तर सुद्धा विद्यार्थींना शिक्षकांची आठवण ठेवत सम्मान देणे हे सुद्धा एक प्रकारचे शाळेतले संस्कारच आहेत.
ह्या प्रसंगी प्राचार्य श्री उईके सर यांनी आजच्या स्थितीत शासकीय विद्यालयाचे होणारे हाल कमी होत असलेली पटसंख्या बद्द्दल चिंता व्यक्त केली आजच्या काळात बहुतांश विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे धाव घेत आहे, शासनाने शासकीय विद्यालायांकडे दुर्लक्ष केले तर काही काळात हे विद्यालय इतिहास जमा होणार हे नक्की.
या प्रसंगी कोरोना योद्धा खुशाल लडके यांना सन्मानित करण्यात आले. उपस्थित शिक्षकांना शॉल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देण्यात आले. यावेळी मारोती कुरवटकर, माया लोणकर, सुनील रामगिरीवर, मनीष वांढरे यांनी मनोगत व्यत्क्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय बोबडे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. अमोघ कल्लुरवार व मनोज तेलीवार यांनी केले. आभार मनोहर आइटलावार यांनी मानले.
हा कार्याक्रम यशस्वी करण्याकरिता सुनील रामगिरीवर, मनोज तेलीवार, नीलकंठ पचारे, मनोहर आइटलावार यांनी अथक परिश्रम केले.