सोनार समाज बहुउद्देशिय संस्था शाखा राजुरा तर्फे “कोजागिरी पौर्णिमा व स्नेह मिलन समारोह संपन्न..*

0
157

*सोनार समाज बहुउद्देशिय संस्था शाखा राजुरा तर्फे “कोजागिरी पौर्णिमा व स्नेह मिलन समारोह संपन्न..*

 दिनांक ०४ नोव्हेंबर २०२३ रोज शनिवार ला स्वयंवर मंगल कार्यालय,राजुरा सोनार समाज बहुउद्देशिय संस्था शाखा राजुरा तर्फे “कोजागिरी पौर्णिमा व स्नेह मिलन समारोह संपन्न झाला… त्यावेळी समारोहचे उद्घाटक म्हणून मा. श्री. संजय भाऊ गजपुर, माजी जि. प. सदस्य तथा भाजपा जिल्हा महामंत्री, समारोहाचे अध्यक्ष मा.श्री. प्रफुल भाऊ चावरे संस्थापक/अध्यक्ष सो.स.बहु.सं.जिल्हा चंद्रपूर. प्रमुख अतिथी मा. श्री. सुमेध कासुलकर,कार्यकारणी कोषाध्यक्ष. विशेष अतिथी मा. श्री. प्रा.यमनुरवार सर, मा.श्री. पुरुषोत्तमजी मुजुमदार,तालुका उपाध्यक्ष सो.स.बहु.स. सौ. राधाताई सरोदे महिला जिल्हा अध्यक्ष, सौ. किर्तीताई काळे शहराध्यक्ष, सौ. प्रणिताताई जुमडे कोषाध्यक्ष, सौ. शितलताई मस्के उपाध्यक्ष, सौ. कविताताई कावळे, सौ. अश्विनीताई जुमडे व सौ. रेवतीताई जुमडे उपस्थित होते. सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा प्रतिमेची पूजा अर्चना करण्यात आली त्या नंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन स्वागत व आपल्या मराठी हिंदू संस्कृती प्रमाणे सर्व महिलांचे हळद कुंकू व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या सामारोहाची प्रस्तावना श्री सुमेधभाऊ कासुलकर यांनी केली तर श्री. प्रा.यमनुरवार सर, श्री. संजय भाऊ गजपुरे तसेच श्री. प्रफुल भाऊ चावरे यांनी समाज बांधव भगिनींचे मोलाचे मार्गदर्शन केले..

ऑनलाईन जिल्हा स्तरीय रांगोळी स्पर्धे चा निकाल जाहीर करण्यात आला पहिला क्रमांक किर्ती काळे चंद्रपूर, द्वितीय क्रमांक गायत्री देवगिरकर सिंदेवाही, तिसऱ्या क्रमांक मनीषा पवार राजुरा, प्रोत्साहन स्वर्णिका सरोदे व योगिनी मस्के यांना मान्यवरांचा हस्ते देण्यात आले व सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.

राजुरा शहर महिला पदग्रहण करण्यात आले. त्यावेळी राजुरा शहरातील व आजू बाजूच्या परिसरातील सर्व शाखेतील मोठ्या असंख्य समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.

संचालन सौ. मनीषा पवार व सौ. नम्रता पांढरे यांनी केले. सौ. निशा पांढरे यांनी सर्वांचे आभार मानले.

सोनार समाज बहुउद्देशिय संस्था जिल्हा सचिव श्री. आशिषभाऊ यमनुरवार, राजुरा शहर अध्यक्ष श्री संदीप पांढरे, शहर सचिव श्री रामकुमार पवार, शहर उपाध्यक्ष श्री संतोष भाऊ बद्देलवार, शहर कार्यध्यक्ष श्री. विजय भाऊ सरोदे, कुणाल लुथडे, सौ. मनीषा पवार सौ. नम्रता सं.पांढरे, सौ. कांचन पांढरे, सौ. निशा पांढरे, सौ. प्राजक्ता बुटे,सौ. सरोज अडानिया, श्रीमती पुजा लुथडे व सौ सरोदे यांनी या समारोहाच्या यशस्वी साठी अतिख परिश्रम घेतले..

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

✒️ चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी आशिष रा. यमनुरवार..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here