वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे आवश्यक

0
10

वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे आवश्यक

चंद्रपूर, दि. 06 : 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची तरतुद करण्यात आलेली आहे.

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातुन सर्व वाहनांना एचएसआरपी (HSRP) बसविणे आवश्यक असून सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देशही दिलेले आहेत. याअन्वये चंद्रपूर जिल्हातील सर्व वाहन धारकांना त्यांच्या वाहनांना एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट बसविण्याकरिता पुढीलप्रमाणे सुचना जारी करण्यात आली आहे.

1. चंद्रपूर जिल्ह्याकरिता M/S FTA HSRP SOLUTION PVT LTD ही एजन्सी निश्चित करण्यात आली असून एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता http:maharashtrahsrp.com हे पोर्टल निश्चित करण्यात आलेले आहे. 2. वाहनधारकांनी वरील पोर्टल बुकिंग करून त्यांच्या सोईप्रमाणे अपॉईमेंट घेऊन एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी. 3. वाहनधारक चंद्रपूर कार्यालयातील नोंदणीधारक नसला तरी काही कामानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात वाहन वापरत असेल तरी देखील सदर वाहनास नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. 4. सदर एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरीता पुढीलप्रमाणे जीएसटी वगळुन शुल्क आकारण्यात येणार आहे. दुचाकी/ट्रॅक्टर करीता 450 रुपये, तीन चाकी वाहनाकरीता 500 रुपये आणि इतर सर्व वाहने 745 रुपये.

5. वाहनधारकांना त्याच्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपुर येथे तक्रार दाखल करू शकतात. 6. वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त योजना चढविणे / उतरविणे/ दुय्यमप्रत/ विमा अद्यावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येईल, याची नोंद घ्यावी. तसेच एचएसआरपी नंबर प्लेट नसलेली वाहने, बनावट एचएसआरपी नंबर प्लेट असलेली वाहने, आदीवाहनांवर कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here