पो.स्टे. चंद्रपुर शहर येथील रेकार्डवरील १०० सराईत गुन्हेगारांवर स्थानबध्द कार्यवाही.

0
190

पो.स्टे. चंद्रपुर शहर येथील रेकार्डवरील १०० सराईत गुन्हेगारांवर स्थानबध्द कार्यवाही पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथे दिनांक १८/११/२०२४ रोजी मा.

 

पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपुर मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. प्रभावती एकुरके मॅडम चंद्रपुर शहर, व शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे अन्वेशन विभागातील अधिकारी व त्यांचे टिमने शरिराविरूध्द, मालमत्तेविरूध्द व अवैध्य दारूविकी करणारे रेकार्डवरिल १०० सराईत गुन्हेगार यांचेवर क. १६३(२) बि.एन.एस.एस. अन्वये मा. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधिक्षक कार्यालय चंद्रपुर येथे पुढील आदेश होणेस प्रस्ताव पाठविण्यात आले. व मा. विषेश कार्यकारी दंडाधिकरी तथा अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम यांनी सदर रेकार्डवरिल १०० सराईत गुन्हेगारांचे दि. १८/११/२४, दि. १९/११/२४ व दि. २०/११/२४ असे तीन दिवस स्थानबध्द आदेश काढण्यात आले.

 

(टिप-दि. २०/११/२४ रोजी मतदान वेळेत मतदान बुथवर जाउन मतदानाचा अधिकार अबाधीत ठेवुन मतदान वेळेत त्याने मतदानाचा हक्क बजावुन झाल्यानंतर त्याला लगेच राहत असलेल्या जागी राहण्यास बंदी आहे.)

 

दि. २०/११/२४ रोजी विधानसभा निवडणुक असल्याने सदर कालावधीत सदर सराईत आरोपीचे गुन्हेगारी वृत्ती सुरू राहिल्यास त्या दरम्यान झगडे भांडण करून शांततेचा भंग होउन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होउन गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता त्यांना तीन दिवसाकरीता स्थानबध्द करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here