*उमेश सोरते यांची जिल्हा न्यायाधिश या पदावर निवड* –

0
21

*उमेश सोरते यांची जिल्हा न्यायाधिश या पदावर निवड* – गडचिरोली तालुक्यातील वसा येथील उमेश केशव सोरते यांचे नुकतेच जिल्हा न्यायाधीश या पदावर मा. उच्च न्यायालय मुंबईने निवड केली आहे. सध्या ते जुलै २०२३ पासून सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट -अ या पदावर न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) चंद्रपूर शहर जि. चंद्रपूर येथील न्यायालयात कार्यरत आहेत. त्याआधी ते नायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) आष्टी, जिल्हा वर्धा येथे सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ या पदावर तसेच गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी वकिलीचा व्यवसाय करत होते. उमेश सोरते यांची घरची परिस्थिती हलाखीची, शेतकरी कुटुंबातील असल्याने शासकीय नोकरी मिळवण्यासाठी त्यांना खूप परिश्रम घ्यावे लागले. ते सहाय्यक सरकारी अभियोक्ता असताना सुद्धा त्यांच्यामध्ये खूप जिद्द व चिकाटी असल्यानेच या पदावर पोहोचू शकले. मागील वर्षी त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये अवर सचिव (विधी) गट-अ या पदासाठी मंत्रालय मुंबई येथे निवड झाली होती, मात्र त्यांना जिल्हा न्यायाधीश व्हायचे असल्याने त्यांनी ते पद स्वीकारलेले नव्हते. या पूर्वी सुद्धा त्यांनी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तसेच जिल्हा न्यायाधीश पदाकरिता मुलाखत दिलेली होती, मात्र परीक्षांमध्ये अगदी थोड्या मार्कांनी चांगली संधी हुलकावणी देत होती. या अपयशामुळे न खचता आयुष्याचा खडतर प्रवास कायम ठेवून आपल्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी त्यांनी सतत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून उच्च पदाच्या परीक्षा देण्याचा निर्णय ठाम ठेवला. अखेर मा. उच्च न्यायालय मुंबई ने सन २०२२ करिता घेतलेल्या चाळणी परीक्षा, लेखी परीक्षा व मुलाखती मध्ये उत्तम प्रकारे यश संपादन करून उमेश सोरते यांची नुकतीच ‘जिल्हा न्यायाधिश’ या पदाकरिता निवड झाली आहे. यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, काका-काकू, भाऊ- वहिनी, बहीण व मित्रपरिवार यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here