गोसेवा हे पवित्र आणि ईश्वरीय कार्य* 

0
13

*गोसेवा हे पवित्र आणि ईश्वरीय कार्य*

 

*ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन*

 

*लोहारा येथे गोरक्षण बाधंकामाचे भूमीपूजन*

 

*चंद्रपूर, दि. 11 : गोमाता हिंदू धर्माचे पावित्र्य आणि मातृत्वाचे प्रतीक आहे. गायीला हिंदू संस्कृती आणि अध्यात्मात महत्त्वाचे स्थान आहे. गायीचे दूध अमूल्य आणि पवित्र असून दुधाचे वर्णन वेदांमध्ये अमृत म्हणून केले जाते. त्यामुळे गोमातेची सेवा करणे हे पवित्र आणि ईश्वरीय कार्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.*

 

लोहारा येथील गोरक्षण बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उमेश हिरुडकर, लोहारा ग्रामपंचायतच्या सरपंचा किरण चालखूरे, उपसरपंच शालिक मरस्कोल्हे, भाजपा नेते रामपाल सिंग, प्रशांत कोलप्याकवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

ना. मुनगंटीवार म्हणाले, ‘गोमातेची सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे सौभाग्य आहे. अर्थमंत्री असताना सरकारच्या माध्यमातून गोभक्तांची व गोवंशाची सेवा करण्याची संधी प्राप्त प्राप्त झाली. महाराष्ट्रात नोव्हेंबर 1995 मध्ये गोरक्षणाचे बिल मंजूर करण्याचे कार्य केले. बजेटमध्ये प्रत्येक जिल्ह्याची एक गोशाळा गोवर्धन गोवंश योजनेच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय केला. जिल्ह्यामध्ये एक महत्त्वाची गोशाळा व्हावी यासाठी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये 36 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्याचे कार्य केले असून गोवर्धन गोवंश या योजनेला मान्यता मिळवून दिली. मागील कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील देशी गायींसाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. ही योजना गुजरात व राज्यस्थान मध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनेपेक्षा मोठी आहे.’

 

*भारतीय देशी गायींची मागणी जास्त*

महाराष्ट्रामध्ये देशी गायींसाठी 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय केला. जगातील ब्राझील, नेदरलँड आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये दुधाचे उत्पादन वाढीसाठी विविध पद्धतीने हायब्रीड गाई जन्माला घातल्या जातात. मात्र, भारतातील देशी गायीची डिमांड जगातील इतर देशांमधील गायींच्या तुलनेत आजही अधिक आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. या गोरक्षण केंद्राकरीता अनुदानाच्या माध्यमातून 750 गायी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या गाईच्या चाऱ्यांसाठी गाव समितीने मुरघास चाऱ्याच्या संदर्भात प्रयोग करण्याच्या सूचना केल्या आहेत.

 

*गावाच्या विकासासाठी पुढे या*

लोहारा गावाच्या विकासाचा निर्णय गाव समितीने घेण्याची आवश्यकता आहे. रोजगार निर्मितीतून गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी बचत गट, आदिवासी कुटुंब तसेच ओबीसी कुटुंबाशी चर्चा करून गाईचे पालन पोषण व दुधाच्या व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करावे. यासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी प्रयत्नशील असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले. लोहारा येथील गोसेवा केंद्र गाईच्या भक्तांचे सेवा करण्याचे केंद्र होईल असा विश्वास व्यक्त करत विदर्भातल्या गोसेवा केंद्रापेक्षा लोहाऱ्यातील गोसेवा गोरक्षण केंद्र उत्तम व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचेही पालकमंत्री ना. मुनगंटीवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here