फॉरेस्ट अकॅडमी चंद्रपूर, येथे जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या
“योग प्रशिक्षण” वर्गाची सुरुवात..
फॉरेस्ट अकॅडमी चंद्रपूर व जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूर, शाखा-चंद्रपूर, यांच्या संयुक्त विद्यमाने
दि. 07 ऑक्टोबर 2024 ला सकाळी 6.00 वाजता, “योग प्रशिक्षण वर्ग” शुभारंभ सोहळा, कार्यक्रमाचे अध्यक्ष फॉरेस्ट अकॅडमी चंद्रपूरचे डायरेक्टर मा. श्री. एम. श्रीनिवास रेड्डी व प्रमुख अतिथी मा. श्री. मिलिंद वझलवार, कार्यवाह, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, मा. श्री. वसंत नानेकर, परीक्षा प्रमुख, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ चंद्रपूर शाखे तर्फे सलग एक वर्ष, फॉरेस्ट अकॅडमी मधील फॉरेस्ट गार्ड, फॉरेस्टर, आर.एफ.ओ. व इतर सर्व प्रशिक्षणार्थींना योग प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थींना मंडळाच्या विविध योग प्रमाणपत्र परीक्षेस बसविण्याचा मानस असल्याचे फॉरेस्ट अकॅडमी चे डायरेक्टर श्री. एम. श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे दरवर्षी निःशुल्क योग परिक्षा घेण्यात येते. पहिली परीक्षा *योग परिचय प्रमाणपत्र*, हि परिक्षा एस. एन. डी. टी. विद्यापीठाशी संलग्न आहे. त्या नंतर *’योग प्रवेश पदविका’* व *’योग प्रवीण ‘* या दोन्ही परीक्षा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाशी संलग्न आहे. यात विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रशिक्षण दिल्या जाते. या सोहळ्यात प्रमुख अतिथी मा. श्री मिलिंद वझलवार यांनी योगविषयक मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाला मंडळांचे संपर्क प्रमुख श्री. जयंत काटे सर, योग शिक्षक श्री अनिल सर, तसेच अकॅडमीचे सत्र संचालक श्री. दहीवले सर, मंडळांचे ज्येष्ठ योगशिक्षक श्री नत्थुजी मत्ते सर, श्री. गुणवंत गोगुलवार सर, जिल्हा संघटक श्री मोहन ताटपल्लीवार, डॉ. रवि कटलावार, तसेच प्रशिक्षण देणारे मंडळांचे सर्व योगशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
डॉ. मनिषा कटलावार यांनी केले तर आभार प्रदर्शन योगशिक्षक श्री. विवेक डूबेवार यांनी केले.