मुंग, उडीद व सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी सुरू

0
18

मुंग, उडीद व सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी सुरू

 

चंद्रपूर, दि. 4 : राज्य शासनाने हंगाम 2024-25 मध्ये एन.सी.सी.एफ. (NCCF) च्यावतीने मुंग, उडीद व सोयाबीन खरेदीस 26 सप्टेंबर 2024 च्या पत्रानुसार मान्यता दिलेली आहे. त्यानुसार दि. 1 ऑक्टोबर 2024 पासून मुंग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार कडधान्य व तेलबिया खरेदी करण्यासाठी नाफेड व एन.सी.सी.एफ. (NCCF) या नोडल एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

सदर खरेदीकरीता सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करावयाची असून नोंदणीसाठी येतांना सोबत आधारकार्ड, 7/12 उतारा, चालुवर्षाच्या 7/12 वर पिकपेरा नोंद असावी. चालू खाते असलेले बँकेचे पासबुक आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाने मुंग, उडिद व सोयाबीन विकता येणार आहे.

 

तसेच 10 ऑक्टोबरपासून मुंग, उडीद व सोयाबीन खरेदीला सुरुवात होणार असुन 7 जानेवारीपर्यंत मुंग, उडिद खरेदी आणि 12 जानेवारी 2025 पर्यंत सोयाबीन खरेदी होणार आहे.

 

मुंग, उडीद व सोयाबीन विक्रीकरीता तालुकानिहाय जोडलेली खरेदी केंद्रे : चंद्रपूर खरेदी केंद्राकरिता पोंभुर्णा, सावली, मुल तालुके जोडण्यात आले आहे. राजुरा केंद्राकरिता बल्लारपुर व गोंडपिंपरी, गडचांदूर केंद्राकरिता कोरपना, जिवती. चिमुर केंद्राकरीता ब्रम्हपुरी, सिंदेवाही व नागभिड तालुके जोडण्यात आले असून वरोरा केंद्राकरीता भद्रावती तालुका जोडण्यात आला आहे. जिल्हयातील एकूण 5 खरेदी केंद्रावर NCCF मार्फत मुंग, उडीद व सोयाबीन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

 

तरी शेतकऱ्यांनी एन.सी.सी.एफ. (NCCF) ने ठरवून दिलेल्या कालावधीत आपल्या नजिकच्या केंद्रावर जावून मुंग, उडीद व सोयाबीन विक्री व नोंदणी करावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही .एस. तिवाडे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here