अंकिता शेंडे पहिल्या आठवड्याच्या विजेत्या

0
20

अंकिता शेंडे पहिल्या आठवड्याच्या विजेत्या

 

Ø स्वीप उपक्रमांतर्गत मतदार जनजागृती मोहीम

 

चंद्रपूर, दि.4 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वीप उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पाच आठवड्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून पहिल्या आठवड्याच्या स्पर्धेचा निकाल लकी ड्रा द्वारे काढण्यात आला आहे. यात अंकिता देविदास शेंडे या विजेत्या ठरल्या आहेत.

 

23 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2024 दरम्यान गुगल फॉर्मद्वारे स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत 192 सहभागी नागरिकांपैकी 161 नागरिकांनी गुगल फॉर्मद्वारे विचारलेल्या 4 प्रश्नांना 100 टक्के अचूक उत्तरे दिली आहेत. या 161 सहभागी नागरिकांपैकी लकी ड्रॉ काढण्यात आला असून यात अंकिता देविदास शेंडे पहिल्या आठवड्याच्या स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या.

 

जिल्हा प्रशासनाने विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले असून मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सर्व नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येत असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे यांनी कळविले आहे.

 

०००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here