पोलीसानी वाचविला जिव देण्यास गेलेल्या महीलेचा जिव

0
40

पोलीसानी वाचविला जिव देण्यास गेलेल्या महीलेचा जिव

 

पोलीस उपनिरीक्षक कपिल गुघे पो.स्टे. चंद्रपुर शहर दि.२५/०९/२०२४ रोजी डी.ओ. ड्युटी करीता पो.स्टे. चंद्रपुर शहर येथे हजर असताना डॉयल ११२ कर्मचारी नामे रंमाकात कांबळी याना रामाळा तलाव येथे एक महीला स्वताचे जीवाचे बरेवाईट करण्याचे उद्देशाने फिरत आहे अशी माहीती मिळाले वरून ते स्वता व ११२ चे पोलीस हवालदार रंमाकांत कांबळी, नवनित सोनुले, मपोअ कृती उराडे यांचे सह तात्काळ रामाळा तलाव परीसरात गेले असता एक महीला रामाळा तलावात उडी मारण्याचे तयारीत दिसली. तेव्हा पोउपनी कपील गुघे यांनी महीला कॉन्स्टेबल यांचे मदतीने सदर महीलेस पकडुन काठावर आणुन महीला नामे निलु सुमित गेडाम रा. बाबुपेठ वार्ड, चंद्रपुर हीचे जिव वाचविले. सदरच्या महीलेची प्रकृती बरोबर नसल्याने तिची वैदयकिय तपासणी सा.रू.चंद्रपुर येथे करून तिचे आई व पतीचे ताब्यात दिले.

 

चंद्रपुर शहर पोलीसांच्या सतर्कतेमुळे महीलेचे प्राण वाचुन एका अप्रीय घटना घडण्यापासुन वाचली आहे. सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक श्रीमती एकुरके मॅडम, यांचे मार्गदर्षनाखाली पोउपनि कपिल गुघे, पोहवा रमाकांत कांबळी, पोअ नवनित सोनुले, मपोअ क्ती उराडे, यानी केलेली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here