आंतरराज्यीय चोरांची टोळी चंद्रपूर शहर पोलिसांच्या ताब्यात

0
45

आंतरराज्यीय चोरांची टोळी चंद्रपूर शहर पोलिसांच्या ताब्यात

 

 

चंद्रपूर :- किरायाने राहणाऱ्या मित्रांपैकी एक मित्र स्वीमिंग ला गेला असता घरातील लॅपटॉप, टॅब व मोबाईल चोरणाऱ्या चोरांच्या आंतरराज्यीय टोळीला चंद्रपूर शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासात तपास करीत बेड्या ठोकल्या, यात तामिळनाडू राज्यातील 4 आरोपीना अटक करण्यात आली असून चोरी गेलेले लॅपटॉप, टॅब व मोबाईल असा एकूण 1,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Chandrapur Crime News

 

 

चंद्रपूर शहरातील समाधी वार्ड येथील प्रेमीला अपार्टमेंट येथे किरायाने राहणारे समाधान दिवाकर चुधरी, वय २९ वर्षे, धंदा प्रायव्हेट जॉब (एम.आर.) हे आपले तीन मीत्रासह किरायाने राहत असुन ते सकाळी 6 वाजता स्वीमींगसाठी आझाद गार्डन येथे गेले असता, ते सकाळी बाहेरून दरवाजा खुला (टेकवुन) गेले तेव्हा मित्र झोपुनच होते. फिर्यादी स्वीमींग करून परत 8.15 ला आले असता, तेव्हा पण त्यांचे मित्र झोपुनच होते. त्यानंतर समाधान चुधरी यांनी त्यांचे लॅपटॉप पाहिले असता, दिसले नाही तसेच टॅब व मोबाईलसुध्दा दिसले नाही. त्यामुळे मित्रांना झोपेतुन उठविले व त्यांना विचारपुस केली. व रूममध्ये शोधाशोध केली मिळुन आले नाही. रूममधील एक डेल कंपणीचा लॅपटॉप, एक लेनोवो कंपणीचा लॅपटॉप, एक रियलमी कंपणीचा जुना वापरता मोबाईल, एक रियलमी कंपणीचा जुना वापरता टॅब, एक सॅमसंग कंपणीचा जुना वापरता टॅब व एक सॅमसंग कंपणीचा जुना वापरता टॅब असा एकुण 1,18,000/- रू. चा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याची तक्रार समाधान चुधरी यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. Chandrapur City Police Station

 

 

 

गुन्ह्याचे गांर्भीय लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, पोनि. प्रभावती एकुरके चंद्रपुर शहर यांचे मार्गदर्शनात गुन्हयातील अज्ञात आरोपीचा सि.सी.टि.व्ही. च्या आधारे शोध घेउन पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथील डी.बी पथक मधील सपोनि. मंगेश भोंगाळे, सपोनि. निलेश वाघमारे तसेच डि.बी. कर्मचारी यांनी तात्काळ पो.स्टे. परिसरात आरोपी शोध कामी रवाना होवुन गुप्त बातमीदाराच्या आधारे माहिती मिळताच आरोपीस गुन्हा दाखल झालेपासुन 24 तासाच्या आत आरोपी कार्तीक शंकर वय 22 वर्षे, रा. उदयराजापल्लम ता. थोतालम जि. वेल्लुर राज्य तामीलनाडु, सत्तीकुमार सनकरन बोट्टु, वय 26 वर्षे, रा. उदयराजापल्लम ता. थोतालम जि. वेल्लुर राज्य तामीलनाडू, मगेश पेरूमल नल्लामनशुशान, वय 25 वर्षे, रा. गुडियारथम, ता. थोट्टीथोराईमोत्तुर जि. वेल्लुर राज्य तामीलनाडु आणी सतीश मुन्नीस्वामी सल्लापुरी, वय 20 वर्षे, रा. गुडियारथम, ता. थोट्टीथोराईमोत्तुर जि. वेल्लुर राज्य तामीलनाडु ताब्यात घेतले असून आरोपीकडून चोरीतील एक डेल कंपणीचा लॅपटॉप, एक लेनोवो कंपणीचा लॅपटॉप, एक रियलमी कंपणीचा जुना वापरता मोबाईल, एक रियलमी कंपणीचा जुना वापरता टॅब, एक सॅमसंग कंपणीचा जुना वापरता टॅब, व एक सॅमसंग कंपणीचा जुना वापरता टॅब असा एकुण 1,18,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Gang of inter-state thieves nabbed by Chandrapur city police

 

यातील आरोपी यांची टोळी असुन ते तामीळनाडु राज्यातील रहिवासी आहेत. ते बल्लारशा येथे रूम करून राहत असुन ते चंद्रपुर येथे चोरी करण्याकरीता आलेले होते. सदर आरोपी सकाळी 6 ते 9 वा. दरम्यान लोकांच्या घरात प्रवेश करून ईलेक्ट्रॉनिक वस्तु (लॅपटॉप व मोबाईल) चोरी करण्याच्या सवईचे आहेत. चोरीचा माल ते चोरबाजार चेन्नई येथे विकत असल्याचे कबूल केले.

 

पुढील तपास पो.हवा. कपुरचंद खरवार पो.स्टे. चंद्रपुर शहर हे करित आहे.

 

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. प्रभावती एकुरके चंद्रपुर शहर, सपोनि. मंगेश भोंगाडे, सपोनि. निलेश वाघमारे, पोहवा कपुरचंद खरवार, पो.हवा. सचिन बोरकर, म.पो.हवा. भावना रामटेके, पो.हवा. संतोष कनकम, पो.अं. इम्रान खान, दिलीप कुसराम, ईरशाद खान, रूपेश रणदिवे, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here