अनुसूचित जमातीच्या विविध योजनांचा लाभ घ्या   Ø शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे आवाहन

0
137

अनुसूचित जमातीच्या विविध योजनांचा लाभ घ्या

 

Ø शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे आवाहन

 

चंद्रपूर, दि.2 : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत रोजगार व स्वयंरोजगार करण्याच्या उद्देशाने अनुसूचित जमाती (एस.टी.) या प्रवर्गातील 18 ते 45 वय असलेले स्त्री – पुरुष व बचत गटांना दीर्घ मुदतीवर अल्प व्याजदराने विविध कर्जांचे वितरण होत असते. त्या अनुषंगाने सदर कार्यालयाकडे सन 2024-25 या वर्षाकरीता राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली, पुरस्कृत कर्ज योजनेच्या धर्तीवर राज्य शासन पुरस्कृत मुदत कर्ज योजना व महिला सशक्तीकरण कर्ज योजनेचे एकूण 27 लक्षांक / उद्दिष्ट प्राप्त झाले आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून या योजनांचा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने केले आहे.

 

या आहेत योजना आणि उद्दिष्ट : 1. महिला सबलीकरण योजना (प्रत्येकी 2 लक्ष रुपये, उद्दिष्ट – 8), 2. कृषी आणि संलग्न व्यवसाय (प्रत्येकी 5 लक्ष रुपये, उद्दिष्ट – 2), 3. हॉटेल / ढाबा (प्रत्येकी 5 लक्ष रुपये, उद्दिष्ट – 2), 4. ऑटो वर्कशॉप / स्पेअर पार्ट / गॅरेज (प्रत्येकी 5 लक्ष रुपये, उद्दिष्ट – 2), 5. वाहन व्यवसाय (प्रवासी किंवा मालवाहू) (प्रत्येकी 10 लक्ष रुपये, उद्दिष्ट – 2), 6. वाहन व्यवसाय (प्रवासी किंवा मालवाहू) (10 लाखांपेक्षा जास्त व 15 लाखांच्या आत, उद्दिष्ट – 3), 7. लघु उद्योग व्यवसाय (प्रत्येकी 3 लक्ष रुपये, उद्दिष्ट – 3), 8. ऑटो रिक्षा / मालवाहू रिक्षा (प्रत्येकी 3 लक्ष रुपये, उद्दिष्ट – 2), 9. स्वयंसहायता बचत गट (प्रत्येकी 5 लक्ष रुपये, उद्दिष्ट – 3).

 

येथे करा संपर्क : अधिक माहितीकरीता शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, शाखा कार्यालय, चंद्रपूर, मधूबन प्लाझा, तिसरा माळा, माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल शेजारी, शिवाजी नगर, चंद्रपूर येथे किंवा 9422945512 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे शाखा व्यवस्थापक आर.एस. भदाणे यांनी कळविले आहे.

 

००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here