पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा 28 ऑगस्ट रोजीचा दौरा
चंद्रपूर, दि. 27 : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा 28 ऑगस्ट रोजीचा चंद्रपूर जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मूल येथील कन्नमवार सभागृह येथे आदिवासी समाजाच्या सभेस उपस्थिती, सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर येथील पंचतेली हनुमान मंदीर, जटपुरा वॉर्ड येथे दहिहांडी कार्यक्रमास उपस्थिती, सायंकाळी 6 वाजता चंद्रपूरवरून नागपूरकडे प्रयाण.