*उद्या चिमूर क्रांती भूमित रक्षाबंधन कार्यक्रमात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळी येणार.*
✍️ शुभम गजभिये चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांची प्रमुख उपस्थिती.
——-००——–
भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तालुका चिमूर च्या वतीने भव्य रक्षाबंधन कार्यक्रम दिनांक २४ ऑगस्ट आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचे आकर्षण महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सह आमदार बंटीभाऊ भांगडिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून मोठया संख्येने महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया नन्नावरे यांनी केले आहे.
दरवर्षी प्रमाणे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्गदर्शनात रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केले जात असून दिनांक २४ ऑगस्ट २४ शनिवार दु १२ वा. अभ्यकर मैदान वरील सभागृहात आयोजित आहे.या कार्यक्रमास महिलांच्या खास भेटीला मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी, आमदार बंटीभाऊ भांगडिया व इतर मान्यवर यांची उपस्थिती राहणार आहे.
चिमूर तालुक्यातील महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया नन्नावरे, प्रदेश चिटणीस ममता डुकरे, दुर्गा सातपुते आशा मेश्राम, गिता लिंगायत, वर्षा शेंडे, भारती गोडे, प्रतिभा गेजिक, वैशाली चन्ने, कल्याणी सातपुते, नसीमा शेख रत्नमाला मेश्राम, छाया कंचर्लावार अरुणा नन्नावरे इतर महिलांनी केली आहे.