व्यावसायिक पायलट प्रशिक्षण : अर्ज करण्यास 23 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
चंद्रपूर, दि. 19 : नागपूर फ्लाईंग क्लब अंतर्गत चंद्रपूर फ्लाईंग समितीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील 12 वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र या विषयासह) झालेल्या 10 विद्यार्थाना व्यावसायिक पायलट प्रशिक्षणाकरीता विहीत नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे. याबाबतची सविस्तर माहिती chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. व्यावसायिक पायलट प्रशिक्षणाकरीता अर्ज 29 जुलै ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरायचे होते. आता अर्ज भरण्यास 23 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
व्यावसायिक पायलट प्रशिक्षणाकरिता
विहीत नमुन्यातील अर्ज http://chandaflying.govbharti.org या संकेत स्थळावर अर्ज भरावयाचे आहेत. जिल्हा निवड समिती, चंद्रपूर यांनी घेतलेल्या निर्णयानुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने आता 23 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत अर्ज भरण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे, असे चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी कळविले आहे.
000000000000