सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात
भरतीकरिता 21 ऑगस्ट पर्यंत अर्ज आमंत्रित
चंद्रपूर, दि. 19 : जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत जिल्हा परिषदेच्या पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात भरती करायची आहे. यासाठी तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने पदे भरण्याबाबत शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांमधुन जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मानधन तत्वावर नियुक्ती करण्याकरिता दिनांक 17 ते 21 ऑगस्ट 2024 अखेर कार्यालयीन वेळेत आवेदन पत्र, शिक्षण विभाग (प्राथ.) जिल्हा परिषद, चंद्रपूर या कार्यालयात मागविण्यात येत आहे. विस्तृत जाहिरात, अर्जाचे नमुने व इतर प्रारुप www.zpchandrapur.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत, असे शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे यांनी कळविले आहे.