मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त 16 ऑगस्ट रोजी चंद्रपुरात
चंद्रपूर, दि. 13 : भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती सादर करण्याच्या कालावधीत मतदार यादी निरीक्षक तथा नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी 16 ऑगस्ट 2024 रोजी चंद्रपूर येथे येणार आहेत.
त्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11.45 वाजता वीस कलमी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे जिल्ह्यातील खासदार, आमदार तसेच सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी यांनी कळविले आहे.
००००००