17 ऑगस्ट रोजी मिळणार पात्र लाभार्थ्यांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ
Ø पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रियदर्शनी सभागृहात जिल्हास्तरीय कार्यक्रम
चंद्रपूर, दि. 13 : ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहिण’ या महत्वाकांक्षी योजनेचा पहिला लाभ पात्र महिलांना वितरीत करण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महिला व बाल विकास मंत्री यांच्या उपस्थितीत 17 ऑगस्ट रोजी पुणे येथील बालेवाडी येथे राज्यस्तरीय कार्यक्रम नियोजित आहे. याच अनुषंगाने चंद्रपूर येथेही 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता प्रियदर्शनी सभागृह, चंद्रपूर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मूनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहणार आहेत.
राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण या कार्यक्रमात दाखविण्यात येईल. जिल्ह्यातील योजनेसाठी पात्र ठरलेल्या प्रातिनिधिक महिलांना प्रतिकात्मक लाभ वितरण या कार्यक्रमात होणार आहे. योजनेसाठी जिल्ह्यातून एकूण 2 लक्ष 84 हजार अर्ज प्राप्त झालेले असून सुमारे 2 लक्ष 70 हजार महिलांचे अर्ज पात्र ठरलेले आहेत.
योजनेचा लाभ डीबीटी द्वारे अर्जदार महिलांचे खात्यात ऑनलाईन ट्रान्स्फर होणार आहे. त्यामुळे सर्व अर्जदार महिलांनी आपले बँक खाते आधार लिंक असल्याची खात्री करावी. अन्यथा योजनेचा लाभ खात्यात जमा होणार नाही, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
००००००