पालकमंत्र्यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम सकाळी 9.05 वाजता
चंद्रपूर, दि. 13 : भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम गुरुवार दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.05 वाजता राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे.