विद्यार्थी शिष्यवृत्तीला मुकल्यास महाविद्यालय जबाबदार

0
48

विद्यार्थी शिष्यवृत्तीला मुकल्यास महाविद्यालय जबाबदार

चंद्रपूर, दि. 8 : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘महाडीबीटी’ संकेतस्थळावर शिष्यवृतीच्या 2023-24 या सत्रासाठी नव्याने अर्ज भरण्याची ऑनलाईन सुविधा बंद करण्यात आली आहे. असे असतांनाही 500 जास्त अर्ज महाविद्यालयाकडे प्रलंबित आहे. ही अत्यंत धक्कादायक बाब असून विद्यार्थी शिष्यवृतीला मुकल्यास महाविद्यालयास जबाबदार धरले जाणार आहे. तसेच अशा महाविद्यालयांवर कारवाईसुध्दा केली जाणार आहे, असे समाजकल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रलंबित अर्ज असलेल्या महाविद्यालयांमध्ये 1) हिस्लॉप ज्यु.कॉलेज, नगीनाबाग, चंद्रपूर 8 अर्ज प्रलंबित 2) सम्राट अशोक ज्यु.कॉलेज, चिचपल्ली 8 अर्ज 3) नवजीवन नर्सिंग स्कुल, चंद्रपूर 14 अर्ज 4) मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग घोडपेठ 16 अर्ज 5) मीराबाई कांबळे नर्सिंग कॉलेज, ब्रम्हपूरी 78 अर्ज 6)आर्ट, कॉमर्स कॉलेज, गोंडपिपरी 6 अर्ज 7) महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेटाळा 31 अर्ज 8) गव्हर्नमेंट आयटीआय, ब्रम्हपूरी 9 अर्ज 9) महिला बीएड कॉलेज, चंद्रपूर 8 अर्ज.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून संयुक्तपणे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज भरण्यासाठी वेळेावेळी मुदतवाढ देण्यात आली. आता 2023-24 मधील प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरिता अंतिम मुदतवाढ निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार प्रलंबित अर्ज महाविद्यालयास सादर करण्यासाठी 20 ऑगस्ट ही मुदत आहे, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here