‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजने’ चे जिल्ह्यात 39367 अर्ज प्राप्त अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत

0
18

‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजने’ चे जिल्ह्यात 39367 अर्ज प्राप्त

 

अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत

 

चंद्रपूर, दि. 17 : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला / मुलींना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे. या योजनेचे जिल्ह्यात ऑफलाइन आणि ऑनलाईन मिळून एकूण 39 हजार 367 अर्ज प्राप्त झाले आहेत. यात वैयक्तिक रित्या भरलेल्या व इतर संस्थांनी भरलेल्या अर्जाचा समावेश नाही. अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत ऑफलाइन पद्धतीने 22,476 तर ऑनलाईन पद्धतीने 16891 असे एकूण 39 हजार 367 अर्ज प्राप्त झाले आहेत. यात शहरी अंगणवाडी केंद्रात (ऑफलाईन 5529, ऑनलाईन 3859 एकूण 9388 अर्ज), ग्रामीण अंगणवाडी केंद्रात (ऑफलाईन 14931, ऑनलाईन 11994 एकूण 26925 अर्ज), चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सुविधा केंद्रात (ऑफलाईन 1429, ऑनलाईन 535 एकूण 1964 अर्ज), जिल्ह्यातील नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्रात असलेल्या सुविधा केंद्रात (ऑफलाईन 117, ऑनलाईन 90 एकूण 207 अर्ज) तर जिल्ह्यातील विविध सेतू केंद्रामध्ये (ऑफलाईन 470, ऑनलाईन 413 एकूण 883 अर्ज) अर्ज प्राप्त झाले आहेत. यात वैयक्तिकरित्या महिलांनी भरलेले व इतर सामाजिक संस्था व राजकीय पक्षांनी भरलेल्या अर्जाचा समावेश करण्यात आला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here