16 जून रोजी जिवती येथे ग्राम न्यायालयाचे उद्घाटन
चंद्रपूर, दि. 13 : उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक न्यायमुर्ती यांच्या हस्ते जिवती येथे 16 जून 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता ग्राम न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दी भीष्म यांच्यासह राजुरा तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲङ राजेश लांजेवार, ग्राम न्यायालय जिवतीचे न्यायाधिकारी सुहास बेलसरे उपस्थित राहणार आहेत.