आरटीओ कार्यालयातील सफाई कामकाजासाठी सेवा पुरविण्याबाबत दरपत्रके आमंत्रित

0
69

आरटीओ कार्यालयातील सफाई कामकाजासाठी सेवा पुरविण्याबाबत दरपत्रके आमंत्रित

 

चंद्रपूर, दि. 13 : प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथील साफसफाई कामकाजाकरिता पुढील 11 महिन्याच्या कालावधीसाठी सेवा करार करण्यासाठी या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्दीपत्रक अटी व शर्तीसह प्रसिध्द करण्यात आले आहे.

 

या कार्यालयातील साफसफाईचे कामकाज कंत्राटी पध्दतीने करण्यासाठीचे विहित नमुन्यातील दरपत्रक दि.25 जून 2024 पर्यंत मोहोरबंद लिफाफ्यामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, जलनगर, चंद्रपूर येथे प्रत्यक्ष जमा करावीत किंवा पाठवावीत. मुदतीनंतर प्राप्त दरपत्रकाचा विचार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. तसेच दरपत्रके मंजूर अथवा नामंजूर करण्याचे सर्व अधिकार या कार्यालयाकडे राहतील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here