गोदाम बांधकामासाठी 20 जून पर्यंत अर्ज आमंत्रित

0
220

गोदाम बांधकामासाठी 20 जून पर्यंत अर्ज आमंत्रित

 

चंद्रपूर, दि. 11 : राष्ट्रीय खादयतेल अभियान अंतर्गत सन 2024-25 करीता जिल्हयास गोदाम बांधकामाचे लक्षांक प्राप्त झाले आहे. ज्या ठिकाणी गळीतधान्य पिके घेतली जातात, तथापी गोदामाची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी गोदाम बांधकाम करावयाचे आहे. राष्ट्रीय खादयतेल अभियान अंतर्गत जिल्हयास 1 गोदाम बांधकाम घटकाचे लक्षांक प्राप्त आहे. 250 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 12 लक्ष 50 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना/नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील.

 

सदर घटकासाठी शेतकरी उत्पादक संघ/कंपनी (FPO/FPC) यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात दिनांक 20 जून 2024 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे मार्फत करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here