वृक्ष लागवड व संवर्धन हा पर्यावरण संवर्धनाचा मंत्र…… वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. सौरभ गोबाडे
आरोग्य केंद्र जिभगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम
चालू शतकातील जागतीक तापमानवाढ व वातावरणातील बदल या सारख्या मनुष्यनिर्मित समस्येला तोंड देण्यासाठी सामुदायिकरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे. भविष्यकाळात पर्यावरण असमतोलाचे दुष्परिणाम उद्भवू नयेत यासाठी खरे वृत्तांत न्यूज नेटवर्क चे माध्यमातून 5 जून ते 12 जून या कालावधी जागतिक पर्यावरण दिन सप्ताह निमित्याने एक हजार वृक्ष लागवड संकल्पनेतून जीभगाव प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात वृक्षलागवड कार्यक्रम अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जिगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सौरभ गोबाडे यांनी केले. जागतिक पर्यावरण दिन सप्ताह निमित्ताने एक हजार वृक्ष लागवड संकल्पनेतून वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या निमित्याने 10 जुन रोजी आयोजित वृक्षारोपनाचा कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी , वैद्यकीय अधिकारी स्वाती बोरकर मॅडम
पी. सी. बावणे आरोग्य सहाय्यक
शिल्पा गोखले स्टाफ नर्स एन. एन.राऊत परिचर सह अन्य कर्मचारी व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते. प्रसंगी व सर्वांनी एक एक झाड वृक्षारोपण केले वज्र युद्ध न्यूज पोर्टल तथा वज्र युद्ध साप्ताहिक चे संपादक होमदेव तूम्मेवार यांनी सुद्धा वृक्षारोपण कार्यक्रमाच्या प्रसंगी वृक्षारोपण ही काळाची गरज असून सर्वांनी आपल्या वाढदिवसानिमित्त किमान दोन तरी झाडे लावावी असे सूतोवाच केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परिसरात सरू, कडूनिंब, गुलमोहर, इत्यादी रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षलागवडीसाठी २५० खड्डे पाडण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीतम देवगडे यांनी केले तर सचिन ढगे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता कुणाल गर्गेलवार नागेश बारसागडे मोलाची मदत केली.