*संस्थेचे सचिव पुल्लावार सर आणि नवनियुक्त मुख्याध्यापिका नायडू मॅडमच्या नेतृत्वात सिटी कन्या विद्यालय चा पहिल्यांदा नेत्रदीपक असा 92% निकाल*

0
26

*संस्थेचे सचिव पुल्लावार सर आणि नवनियुक्त मुख्याध्यापिका नायडू मॅडमच्या नेतृत्वात सिटी कन्या विद्यालय चा पहिल्यांदा नेत्रदीपक असा 92% निकाल*

 

*गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न*

 

*शाळेच्या यशाचे श्रेय मुख्यध्यापिका यांनी सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना दिले*

 

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या एस.एस.सी. दहावीच्या परिक्षेत चांदा शिक्षण मंडळ द्वारा संचालित प्रतिष्ठित सिटी कन्या विद्यालय चंद्रपूर चा 92% असा उत्कृष्ट निकाल लागला. त्यामध्ये कु. सुहानी डोंगरे, कु. समिधा गावंडे व कु. प्रिया अडबाले या विद्यार्थीनींनी विशेष प्राविण्य प्राप्त केले. संस्थाचे सचिव माननीय पुलावर सर यांच्या मार्गदर्शनात आणि नवनियुक्त मुख्याध्यापिका प्रतिमा नायडू मॅडम त्या नेतृत्वात सर्व शिक्षकांनी कठीण परिश्रमांनी हे यश संपादन केले. यात विद्यार्थींचा व त्यांच्या पालकांचा सुद्धा सहभाग होता.

त्यानिमित्त दिनांक 4 जुन 2024 रोजी सिटी कन्या विद्यालयातर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे विशेष आयोजन करून त्यांचा सत्कार करण्यात आला, प्रस्तुत सत्कार

समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून चांदा शिक्षण मंडळाचे सचिव मा. पुल्लावार सर, सहसचिव मा. रायपुरे मॅडम तसेच सिटी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. नायडु मॅडम यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. प्रस्तुत कार्यक्रमाचे उत्तम संचालन मा. कोटेवार मॅडम यांनी केले. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा. नायडु मॅडम यांनी उत्तमरित्या केले. तसेच मा. थोरात मॅडम आणि मा. तायवाडे मॅडम यांनी विद्यार्थीनींना त्यांच्या भावी जीवनाकरीता विशेष मार्गदर्शन केले. प्रस्तुत कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनींचे पालकांनी सुद्धा आपली विशेष उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापिका नायडू मॅडम, सर्व शिक्षक आणि शाळेच्या व्यवस्थापन मंडळाचे उत्तम शिक्षण दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

प्रस्तुत कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा. उपासे मॅडम यांनी केले तसेच प्रस्तुत कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सिटी कन्या विद्यालयाच्या शिक्षिका, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

 

 

प्रति,

मा. संपादक/जिल्हा प्रतिनिधी

दै..

,

विनंती.

दि. चंद्रपूर

कृपया वरिल बातमी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात / दैनिकात प्रकाशित करावे हि नम्र

आपले नम्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here