पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज :-प्रशांत भाऊ गाडेवार

0
147

पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज :-प्रशांत भाऊ गाडेवार

 

*खरे वृत्तांत न्यूज नेटवर्क तर्फे जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण करून साजरा*..

 

*जागतिक पर्यावरण दिन सप्ताह निमित्याने एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प*

 

प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, वातावरणातील बदल, जागतिकीकरण, रसायनाचा अतिरेकी वापर यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालल्याचे चित्र आहे. वाढते तापमान व त्याचे दुष्परिणाविषयी सतत चर्चाही केली जाते. यंदा तर दुष्काळामुळे तीन महिन्यांपासून तापमानाची चाळिशी आजही ‘जैसे थे’ आहे. मोसमी पाऊस उंभरठ्यावर असताना उष्णतेची काहिली मानवासह पशुपक्ष्यांनाही नकोशी झाली आहे.

 

 

यंदा प्रथमच शासकीय यंत्रणा व सोशल मीडियावर वृक्षारोपणाची किती आवश्यकता आहे याची जोरदार चर्चाही होत आहे. उपाययोजनाही सुचविल्या जातात. पण अंमलबजावणीबाबत मात्र तितकीशी सजगता नसल्याने या चर्चा फोल ठरतात. अशातच खरे वृत्तांत न्यूज पोर्टल च्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिन सप्ताह चे आयोजन करून चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी एक हजार वृक्ष लागवड संकल्प करून वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ आज दिनांक ५ जुन २०२४ ला करण्यातआला पर्यावरण संवर्धनासाठी अधिकाधिक वृक्षलागवड करणे काळाची गरज आहे. शासनासह विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक, संस्था, संघटनांकडून त्यासाठी प्रयत्न होत आहेत.

 

 

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवीती’ या उक्तीप्रमाणे सबंध पर्यावरणातील वृक्ष प्राणी हे आपल्या मानव जातीचेच सगे सोयरे आहेत. त्यांचे रक्षण व संवर्धन करणे हे आपल्या मानव जातीचे आद्य कर्तव्य आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक सामाजिक उपक्रम राबविल्या जातात व खरे वृत्तांत न्यूज पोर्टलच्या माध्यमातून नेहमीच पर्यावरणपूरक व पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने कार्य करत असते. खरे वृत्तांत न्यूज पोर्टल चे मुख्य संपादक मोरेश्वर नारायण उधोजवार यांनी ही पर्यावरण संवर्धनाची परंपरा कायम ठेवलेली आहे. एकूणच पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज बनलेली आहे असे प्रतिपादन शरदचंद्र पवार विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य प्रशांत प्र.गाडेवार यांनी केले.

 

 

 

विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालया च्या कर्मचारी वर्गाने वृक्षांना आळे करून पाणी व्यवस्थापन होईल अशी व्यवस्था निर्माण केली. याप्रसंगी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुभाष कर्णेवार भेट दिली व मनोबल वाढवले व खरे वृत्तांत न्यूज नेटवर्कच्या कार्याची कौतुक केले.

 

वृक्ष लागवड केलेल्या झाडांना आळे केले गेले नंतर. उन्हाळ्यात झाडांना कुठल्याही प्रकारे पाण्याची कमतरता राहू नये अशा अनुषंगाने पाणी व्यवस्थापन केले. यावेळी महाविद्यालयाचे चूनारकर सर यांनी या कार्यक्रमाची प्रस्तुतता कथन केली.

 

 

या कार्यक्रमाप्रसंगी हायस्कूल तथा महाविद्यालयाचे कर्मचारी वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खरे वृत्तांत न्यूज पोर्टलचे विशेष जिल्हा प्रतिनिधी प्रीतम वामनराव देवगडे यांनी विशेष मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here