*सावली तालुक्यातील बोगस, स्वयंघोषित, खंडणीखोर पत्रकारांना आळा बसणार का ?..*

0
343

*सावली तालुक्यातील बोगस, स्वयंघोषित, खंडणीखोर पत्रकारांना आळा बसणार का ?..*

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. पत्रकारिता ही समाजातील वास्तवाचे चित्रण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु, गेल्या काही 3 वर्षांत बोगस पत्रकारांची संख्या वाढत आहे. हे बोगस पत्रकार पत्रकारितेचे नाव खराब करत आहेत. तालुक्यात बोगस पत्रकारांची संख्या वाढत आहे. यामुळे खऱ्या पत्रकारांची प्रतिमा खराब होत आहे. बोगस पत्रकारांकडून ब्लॅकमेलचा धोका देखील वाढत आहे. अनेकजण News Portal तयार करून आणि व्हिडिओ YouTube चॅनेल तयार करून पत्रकारितेचा नवीन धंदा सुरू झाला आहे. सावली तालुक्यात केवळ मोजकेच न्यूज पोर्टल केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मंत्रालयाकडे नोंदणीकृत आहेत. MIB वेबसाईटवर माहिती घेतली असता नोंदणी नसलेले अनेक पोर्टलधारक सरकारी यंत्रणेकडून कोणताही प्रतिबंध नसल्याने ते बेधडकपणे फिरत असतात.

सावली शहर तथा ग्रामीण मध्ये काही अशा बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाला असून, तालुक्यातील शासकीय यंत्रणा या लोकांना पार वैतागून गेली आहे.

 

युट्युब व वेबसाईट बनवून कुठल्याही प्रकारची नोंदणी नसताना आम्ही पत्रकार आहोत, असे सांगून ही मंडळी धमकावून थेट खंडणी उकळत आहेत. अवैध धंदे बंद जरूर करावेत, परंतु पाचशे आणि हजार रुपये घेऊन आम्ही पत्रकार आहोत तुम्हाला पैसे द्यावे लागतील असे सांगत ‘पत्रकार’ शब्दाला हे बोगस लोक काळीमा फासत आहेत.

 

या बोगस पत्रकारांनी फक्त कॉन्ट्रॅक्टदार , अभियंते,पोलिस आणि महसूल विभाग आपले ‘टार्गेट’ केले आहे. आपल्याला दहा-पाच रुपये मिळाले की सगळं सुरळीत करायचं अस धोरण हे बोगस पत्रकार करीत आहेत,

 

 

पत्रकारिता आता अवख्या नवख्या सारखी नसून तर जागोजागी उभारल्याचे पाहवययास मिळत आहे. कधीकाळी पत्रकारिता एक विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जायचे. कुठे ते पत्रकारिता आणि आता सुरु असलेली पत्रकारिता या मध्ये दूरदृष्ठी ची तफावत दिसून येत आहे. नको ती व्यक्ति सध्या पत्रकारितेच घोंगड घेऊन आपली निष्ठठुरता पत्रकारिता करीत आहे. ना पत्रिकारितेचे घ्यान ना लिहण्याचे स्थान स्वतः ला पत्रकार म्हणून खपवून घेऊन ब्लॅकमेल चा प्रकार सद्धया मोठ्या प्रमाणात सुरु आहे. जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेत या भुरट्या टोळी बाज पत्रकारना ठिखाना वर लावणे गरजेचे आहे. जे सत्य पत्रकार असतील त्यांना किमान दाद तरी मिळेल. उद्या क्रिमिनल लॉबी मधून जर पत्रकार च्या नावावर कुठे मोठा घटना क्रम झाला तर पत्रकारितेचे चिरहरणं होईल.

 

मी विशेष प्रतिनिधी, मी एडिटर, मी चीफ ब्युरो, असे सांगत फिरत जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समिती रेती सप्लायर, अवैद्य रेती तस्कर,पोलीस खाते असो की महसूल खाते यांनी जसे सर्टिफिकेट घेत स्वतः ला पत्रकार म्हणून तैयार केले आहे. इथपर्यंतच न थांबता जिल्ह्यावरील काही बोगस पत्रकारांना धरून तुम्ही आमच्या तालुक्यात या मी तुम्हाला जागा सांगतो त्या जागी जा व मिळालेल्या पैशातून रोजगार हमी काम कमी अर्धेआम्ही व आर्धे तुम्ही ही योजना राबवून भंगार चोर, डिझेल चोर, बांधकाम कामगार, असलेल्या पत्रकारांना संघटित करून एक बोगस पत्रकारितेची टीम तयार केलेली असून ही टीम उठली सुठली की पत्रकार म्हणून तैयार होणे आणि टोळक्यानी शिकार करत हफ्ता खाणे हे अशोभनीय गोष्ट आहे.

 

बोगस पत्रकारांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा माहिती

 

अधिकाऱ्यांनी पावले उचलली पाहिजेत. त्यांनी बोगस

 

पत्रकारांची यादी तयार करून त्यांची चौकशी करावी.

 

जेणे करून सर्व सामान्य खऱ्या पत्रकारांना

न्याय मिळेल तसेच पत्रकारितेचा दर्जा वाढण्यास मदत होईल

 

*पुढील भागात पहा कोणते न्यूज पोर्टल तथा कोणता न्यूज पेपर च्या नावाने चालतोय गोरख धंदा*…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here