शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार कृतीपुस्तिका Ø उन्हाळी सुट्टीत अभ्यासासाठी आदिवासी विकास विभागाचा उपक्रम

0
49

शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार कृतीपुस्तिका

 

Ø उन्हाळी सुट्टीत अभ्यासासाठी आदिवासी विकास विभागाचा उपक्रम

 

चंद्रपूर, दि. 6 : आदिवासी विकास विभागाच्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत घरी अभ्यास करण्यासाठी कृतिपुस्तिका देण्यात येणार आहेत. ‘आदिनिपुण’ कार्यक्रमांतर्गत हा प्रकल्प राबविण्याच्या सुचना आदिवासी विकास विभागाच्या आयुक्ता नयना गुंडे यांनी राज्यातील सर्व प्रकल्प अधिका-यांना दिल्या असून त्यानुसार प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत कृतीपुस्तिका देण्यात येणार आहे.

 

आदिवासी विकास विभागाच्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये ‘आदिनिपुण’ कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाच्या विविध संकल्पनांचा विसर पडू नये व उन्हाळी सुटीचा आनंद घेतांनाच शैक्षणिक प्रवाहाची नाळ तुटु नये, यासाठी हा नाविण्यपूर्ण उपक्रम प्रकल्प कार्यालय चंद्रपूर येथे राबवला जाणार आहे.

 

या उपक्रमांतर्गत पहिली ते सातवीच्या कृतिपत्रिका देण्यात येणार आहेत. या कृतिपत्रिकेत विद्यार्थ्यांना मराठी, गणित, सामाजिक, भावनिक, शिक्षण, पर्यावरण अभ्यास अशा विषयांची वर्गनिहाय काठिण्यपातळी, अभ्यासक्रम आणि सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न देण्यातआलेले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या पूर्वज्ञानाच्या आधारावर अथवा पालकांशी चर्चा करून या कृतिपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे लिहिणे व वर्गशिक्षकाने शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे प्रवेशोत्सवाच्या दिवशी भरलेली कृतिपुस्तिका विद्यार्थ्यांकडून जमा करून तपासणे अपेक्षित आहे.

 

8 एप्रिल रोजी मिळणार कृतिपुस्तिका : पहिली ते पाचवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला सदर उन्हाळी सुट्टीत उपक्रमाचे प्रिंट आउट मिळतील. या अनुषंगाने आपल्या कार्यालयाच्या अधिनस्त असणा-या सर्व मुख्याध्यापकांना तात्काळ सुचित करावे. प्रत्येक विद्यार्थ्याला 8 एप्रिल रोजी कृतिपुस्तिका मिळेल, या दृष्टिने मुख्याध्यापकांनी कार्यवाही करावी. याबाबत आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात.

 

पालकांकडून उपक्रमांचे स्वागत : या उपक्रमाचे पालकांकडून स्वागत करण्यात आले असून या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टीत शिक्षणाची नाळ जुळून राहण्यास मदत होणार आहे. शिवाय या उपक्रमांमुळे विद्यार्थी स्वयंअध्ययनाच्या माध्यमातून शिकणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, म्हणून आदिवासी विकास विभागाकडून राबविण्यात येणा-या या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे शिक्षण क्षेत्रात स्वागत करण्यात येत आहे.

 

प्रकल्प अधिकारी यांच्या सुचना : वर्गशिक्षकांनी सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थी व पालक यांच्याशी संपर्कात राहावे. कृतिपुस्तिकेच्या सॉप्टकॉपी मुख्याध्यापकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना पोहचतील, याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी. झेरॉक्स कॉपीचा खर्च आश्रमशाळा व्यवस्थापन समिती या लेखाशिर्षातून भागविण्यात येण्याच्या सुचना प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी प्रकल्पातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here